तुमच्या खाजगी WhatsApp मेसेजेसवर Facebook ची नजर? नवीन रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा By सिद्धेश जाधव | Published: August 5, 2021 05:35 PM 2021-08-05T17:35:16+5:30 2021-08-05T17:41:30+5:30
2021 च्या सुरवातीपासून WhatsApp ची प्रायव्हसी पॉलिसी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आता प्रसिद्ध टेक वेबसाईट Android Authority ने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले आहे कि टार्गेटेड जाहिरातीसांठी फेसबुक व्हॉट्सअॅप युजरच्या मेसेजेसचा वापर करणार आहे. यासाठी फेसबुकने एक रिसर्च टीम कामाला लावली आहे. WhatsApp ने आपल्या एंड-टू-एंड इनक्रिप्शनमुळे खूप लोकप्रियता कामवाली आहे. एंड-टू-एंड इनक्रिप्शनच्या मदतीने पाठवलेले मेसेजेस सेंडर आणि रिसिव्हर यांच्या व्यतिरिक्त कोणीच वाचू शकत नाही, असा कंपनीचा दावा आहे.
फक्त वैयक्तिक मेसेजेस नव्हे तर मोठ्या ग्रुपमध्ये पाठवलेले मेसेजेस देखील फक्त सेंडर आणि रिसिव्हर यांच्या दरम्यान राहतात. यासाठी व्हॉट्सअॅपचे एंड-टू-एंड इनक्रिप्शन कारणीभूत आहे.
यावर्षीच्या सुरुवातीला WhatsApp ने आपल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीची घोषणा केली होती. या घोषणेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे या प्रायव्हसी पॉलिसीची अंमलबजावणी मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
आता प्रसिद्ध टेक वेबसाईट Android Authority ने सांगितले आहे कि Facebook ने एका रिसर्च टीमची नियुक्ती केली आहे. ही टीम इनक्रिप्टेड WhatsApp मेसेजेसचे विश्लेषण करून युजर्सना टार्गेटेड जाहिराती दाखवेल.
इनक्रिप्शनचे विश्लेषण करताना फेसबुक तुमचे WhatsApp मेसेजेस वाचू शकेल कि नाही हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही. परंतु युजर डेटाच्या माध्यमातून टार्गेटेड जाहिराती दिल्या जातील, हे मात्र कंपनीने कन्फर्म केले आहे.
रिपोर्टनुसार Facebook युजरच्या चॅटला डिक्रिप्ट करताना युजरच्या प्रायव्हसीला धक्का लागू देणार नाही. या पद्धतीला होमोमॉर्फिक इनक्रिप्शन म्हणतात.
होमोमॉर्फिक इनक्रिप्शन पद्धतीमध्ये युजरची प्रायव्हसी कायम ठेऊन डेटा गोळा केला जातो. यातून जाहिरातींसाठी आवश्यक ती माहिती मिळते. परंतु रिपोर्टनुसार, Facebook ने होमोग्राफिक इनक्रिप्शन शक्यता तूर्तास नाकारली आहे.