चुकीचं सॉफ्टवेअर मिनिटांत तुमचं बँक खातं रिकामं करू शकतं; जाणून घ्या, कसं टाळायचं? By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 05:20 PM 2022-01-26T17:20:06+5:30 2022-01-26T17:30:06+5:30
Fake Software : मालवेअर मुख्यतः तुमच्या सिस्टमशी छेडछाड करण्यासाठी आणि तुमच्या परवानगीशिवाय त्यात असलेली तुमची सर्व माहिती अॅक्सेस करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. नवी दिल्ली : आजच्या काळात तंत्रज्ञानामुळे लोकांचे काम जितके सोपे झाले आहे, तेवढ्याच फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. फसवणूक करणारे नवनवीन मार्गाने लोकांना आपला बळी बनवत आहेत.
आजकाल सायबर गुन्हेगार विविध पद्धतींद्वारे तुमच्या बँक खात्यातून काही मिनिटांत पैसे काढून घेऊ शकतात. मालवेअर हा देखील यापैकी एक मार्ग आहे. मालवेअर मुख्यतः तुमच्या सिस्टमशी छेडछाड करण्यासाठी आणि तुमच्या परवानगीशिवाय त्यात असलेली तुमची सर्व माहिती अॅक्सेस करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
गुन्हेगारांना मालवेअरद्वारे तुमची माहिती कळताच ते तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा तुमचे कष्टाचे पैसे उडवण्यासाठी त्याचा वापर करतात. परंतु असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही अशा फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकता. याबाबत जाणून घेऊया...
बनावट सॉफ्टवेअरपासून सुरक्षित कसे राहायचे? सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या कॅम्युटरवर किंवा मोबाईलवर कधीही अनधिकृत किंवा परवाना नसलेले सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू नका. तसेच, तुमच्या संगणकावर कोणत्याही अविश्वसनीय फाइल्स ठेवू नका.
तुमचे सिस्टम अँटी-व्हायरस आणि स्पायवेअर डिटेक्शनला नियमितपणे अपडेट करत राहा. दररोज अपडेट करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्ही फसवणुकीपासून लांब राहू शकता.
कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यापूर्वी, तुम्ही काय इन्स्टॉल करत आहात हे नक्की तपासा, कारण कोणतेही चुकीचे सॉफ्टवेअर तुमचा डेटा खराब करू शकते.
कोणत्याही वेबसाइट किंवा सोशल वेबसाइटवर पॉप-विंडोमध्ये तुमचा पासवर्ड, कार्ड डिटेल्स आणि कोड कधीही टाकू नका. तुम्ही तुमची माहिती या विंडोवर टाकल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.