बजेट कमी आहे? मग 15 हजारांच्या आत येणारे हे धमाकेदार फोन्स एकदा बघाच
By सिद्धेश जाधव | Updated: December 20, 2021 19:02 IST2021-12-20T18:50:39+5:302021-12-20T19:02:41+5:30
जर तुम्ही कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तो फ्लिपकार्टवरील सेलचा विचार करू शकता. फ्लिपकार्टवर 15 हजार रुपयांच्या आत काही दमदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. यातील काही फोन्सवर ऑफर्स आणि डिल्ससह 5 हजार रुपयंतची सूट मिळत आहे.

फ्लिपकार्ट सेलमध्ये SBI क्रेडिट कार्ड धारकांना 10 टाक्यांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे. तसेच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर्स 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळवू शकतात.
Motorola G40 Fusion
Motorola G40 Fusion वर 5,000 रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. त्यामुळे हा फोन 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यात 6000mAh ची बॅटरी, 120Hz, 64 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
Samsung Galaxy F22
11 टक्के डिस्काऊंटनंतर Samsung Galaxy F22 चा 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 14,999 रुपये देऊन विकत घेता येईल. जुना फोन एक्सचेंज करून 14,450 आणखीन वाचवता येतील. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 6000mAh ची बॅटरी मिळते.
Moto G51 5G
17,999 रुपयांमध्ये आलेला हा फोन सेलमध्ये 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सोबत 14,450 रुपयांपर्यतची एक्सचेंज ऑफर आहेच. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी आहे.
Realme 8i
Realme 8i वर सेलमध्ये 2 हजार रुपयांची सूट मिळत आहे. हा फोन 13,999 रुपये देऊन विकत घेता येईल. आणखीन बचत करण्यासाठी जुना फोन एक्सचेंज करता येईल.
Realme Narzo 30
14,999 रुपयांच्या या फोनसाठी 13,499 रुपये मोजावे लागतील. सोबत 12,850 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देण्यात आला आहे. हा फोन 48 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 30 वॉट फास्ट चार्जिंगसह बाजारात आला आहे.