फ्लिपकार्टवर ऑफर्सचा धुमाकूळ, सॅमसंगच्या या फोन्सवर धमाकेदार डिस्काऊंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 15:39 IST2018-02-08T15:35:50+5:302018-02-08T15:39:31+5:30

फ्लिपकार्टवर सॅमसंग कार्निवल सुरू झाला आहे. 9 फेब्रुवारीपर्यंत हा सेल असणार आहे. सेलमध्ये सॅमसंग गॅसक्सी S7 हा 46 हजार रूपयांचा स्मार्टफोन 22 हजार 990 रूपयांना मिळतो आहे.
64 जीबीच्या सॅमसंग गॅलेक्सी Nxt हा फोन 11 हजार 900 रूपयांना मिळतो आहे. या फोनवर 6 हजार रूपयांची सवलत मिळते आहे.
सॅमसंग गॅलेक्सी On Max या मोबाइलवर 3 हजार रूपयांचं डिस्काऊंट मिळतं आहे. 13,900 रूपयांना फोन मिळेल.
सॅमसंग J3 प्रो 6990 रूपयांना मिळतो आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ऑन 5 हा फोन 6,290 रूपयांना मिळतो आहे. या फोनवर 2700 रूपये डिस्काऊंट मिळतं आहे.