Gadgets Launched During Festive Celebrations
सणासुदीच्या काळात लाँच झालेली गॅझेट्स By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 08:00 PM2017-09-12T20:00:18+5:302017-09-12T20:00:18+5:30Join usJoin usNext लेनोव्हो कंपनीने आपल्या थिंकपॅड या मालिकेत ए२७५ आणि ए४७५ हे दोन लॅपटॉप सादर केले असून यात विविध प्रॉडक्टीव्हिटी टुल्स प्रदान करण्यात आले आहेत. सॅमसंग कंपनीने आपला गॅलेक्सी सी ८ हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. अमेझॉन कंपनीचे व्हाईस कमांडवर चालणारे इको व इको डॉट हे डिजीटल असिस्टंटयुक्त स्मार्ट स्पीकर तसेच प्राईम म्युझिक ही प्रिमीयम सेवा लवकरच भारतात सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सोनी कंपनीच्या पाठोपाठ जेबीएलनेही गुगल असिस्टंटचा समावेश असणारे स्मार्ट स्पीकर सादर करण्याची घोषणा केली आहे. गुगल कंपनीने आपला गुगल असिस्टंट थर्ड पार्टीजसाठी खुला करण्याची घोषणा केल्यानंतर सोनी कंपनीने याचा समावेश असणारा डिजीटल स्मार्ट असिस्टंट लाँच केला. एसर कंपनीने अतिशय स्वीफ्ट ५, स्पीन ५ आणि स्वीच ७ हे तीन ‘टु-इन-वन’ मॉडेल्स सादर केले असून ते लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारात वापरता येणार आहेत. एसर कंपनीने भारतात खास गेमर्ससाठी प्रिडेटर हेलिओस ३०० हा अतिशय दर्जेदार लॅपटॉप दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्याची घोषणा केली आहे. एसर प्रिडेटर हेलिओस ३०० या मॉडेलमध्ये कोअर आय ७ आणि आय ५ या प्रोसेसरचे दोन व्हेरियंट असून याचे मूल्य १,२९,९९० रूपयांपासून सुरू होणार आहे.टॅग्स :तंत्रज्ञानtechnology