खूशखबर! Apple ची मोठी घोषणा: iPhone 13, 14 , 15 ची किंमत झाली कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 06:17 PM2024-07-26T18:17:47+5:302024-07-26T18:29:04+5:30

कंपनीने पहिल्यांदाच आपल्या प्रो मॉडल्सची किंमतदेखील कमी केली आहे.

आयफोन खरेदी करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण ॲपलने आपल्या अनेक फोन्सची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे ग्राहकांची ६ हजार रुपयांपर्यंतची बचत होणार आहे. कंपनीने पहिल्यांदाच आपल्या प्रो मॉडल्सची किंमतदेखील कमी केली आहे.

ॲपल कंपनीकडून iPhone 13, iPhone 14, iPhone 15 सह iPhone SE ची किंमतही कमी करण्यात आली आहे.

ॲपलच्या या स्मार्टफोन्सला तुम्ही कंपनीच्या अधिकृत स्टोरमधून कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहात.

कंपनीच्या अधिकृत स्टोरच्या व्यतिरिक्त दुसरे रिटेल पार्टनर्सही लवकरच कमी किंमतीसह आयफोनची विक्री करू शकतात.

किती कमी झाली किंमत? ॲपल कंपनीने iPhone 13, iPhone 14, iPhone 15 या फोन्सची किंमत ३०० रुपयांनी कमी केली आहे. तसंच iPhone SE ची किंमत २ हजार ३०० रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

आयफोनच्या प्रो मॉडेल्सचा विचार करता कंपनीने या स्मार्टफोन्सची किंमत ५ हजार १०० रुपयांपासून ६ हजार रुपयांपर्यंत कमी केली आहे.

विशेष म्हणजे पहिल्यांदाच आयफोनच्या प्रो मॉडेल्सची किंमत कमी करण्यात आली आहे.

दरम्यान, सरकारने मोबाइल फोन्स आणि अनेक पार्ट्सवरील कस्टम ड्युटी २० टक्क्यांहून १५ टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळेच ॲपलकडून आपल्या स्मार्टफोन्सची किंमत कमी करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.