आनंदाची बातमी: कमी किंमतीत येणार नवा iPhone; ३५ हजार रुपये असेल किंमत, लॉन्च कधी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 06:20 PM2024-07-23T18:20:17+5:302024-07-23T18:34:46+5:30

आयफोनच्या या नव्या व्हर्जनची किंमत नक्की किती असणार, याबाबत ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

आपल्याकडेही आयफोन असावा, असं स्वप्न अनेकांचं असतं. मात्र या फोनच्या महागड्या किंमतीमुळे अनेकजण आयफोन घेणं टाळतात किंवा हा फोन स्वस्त होण्याची वाट पाहतात.

स्वस्तात आणि बजेटमध्ये आयफोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण अॅपल आपला स्वस्तातील फोन लवकरच लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अॅपलकडून नेक्स्ट जनरेशन iPhone SE मॉडल लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. कमी किंमतीत उपलब्ध होणाऱ्या या फोनमध्ये कंपनी लेटेस्ट फीचर्सही देण्याची शक्यता आहे.

अॅपलच्या नव्या iPhone चे काही फीचर्स सोशल मीडियावर लीक झाले असून या फीचर्सनी ग्राहकांचं लक्ष वेधलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, iPhone SE चे नवे व्हर्जन 2025 मध्ये लॉन्च केलं जाण्याची शक्यता आहे. हा एक 4h जनरेशन आयफोन असेल, ज्यामध्ये अनेक मोठे बदल पाहायल मिळतील.

या आयफोनमध्ये A18 चिपसेट सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे. तसंच आर्टिफिशयल इंटेलिजेंसही या फोनमध्ये उपलब्ध असू शकते. हीच बाब iPhone 16 मध्येही दिसण्याची शक्यता आहे.

iPhone SE 4 मध्ये iOS 18 अपडेट आणि 6 GB रॅम व 8 GB रोमसह बाजारात आणलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान iPhone SE या स्मार्टफोनमध्ये 6.06 इंच OLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. तसंच 60 Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आलाय.

आयफोनच्या आगामी व्हर्जनमध्ये सर्क्युलर टच आइडला हटवलं जाऊ शकतं. त्याऐवजी फेसआय सेंसर दिला जाऊ शक

iPhone SE मध्ये सिंगल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कॅमेरा सेंसरचा विचार करता 48 MP सपोर्ट दिला जाणार असून 12 MP फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.

नवीन आयफोनला मॉडर्न लूक आणि फ्लॅट अॅल्युमिनियम फ्रेममध्ये सादर केला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आयफोनच्या या व्हर्जनची किंमत नक्की किती असणार, याबाबत ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, iPhone SE च्या नव्या मॉडला ४२९ डॉलर म्हणजेच भारतीय किंमतीनुसार ३५ हजार रुपयांच्या किंमतीसर लॉन्च केलं जाण्याची शक्यता आहे.