Google Assistant Driving Mode now available in India and more countries google maps
Google चं नवं फीचर भारतात लाँच; ड्रायव्हिंग करताना कॉल-मेसेजला उत्तर देणं होणार सोपं By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 05:04 PM2021-04-18T17:04:04+5:302021-04-18T17:08:40+5:30Join usJoin usNext Google ने भारत आणि अन्य देशांसाठी आणलं नवं फीचर गाडी चालवता आपल्या मोबाईलवरील कॉल किंवा मेसेजला उत्तर देणं धोकादायक ठरू शकतं. अनेकदा सूचना दिल्यानंतरही ड्राईव्ह करताना लोकं याचा वापर करताना दिसतात. यामुळे लोकं आपला जीव तर धोक्यात टाकतातच, परंतु दुसऱ्यांचा जीवही धोक्यात टाकणअयाचं काम कलं जातं. गाडी चालवताना अनेक जण Google Maps चा वापर करत असतात. एखादं ठिकाण शोधण्यासाठी तो सोयीस्कर मार्ग आहे. सध्या गुगलनं आपल्या ग्राहकांसाठी एक नवं फीचर आणलं आहे. यामुळे युझर्सना गाडी चालवताना कॉल रिसिव्ह करणं आणि मेसेजला उत्तर देणं थोडं सोपं होणार आहे. Google च्या सपोर्ट पेजनुसार Google maps मध्ये Google नं असिस्टंड ड्रायव्हिंग मोड हे फीचर दिलं आहे. हे फीचर यापूर्वी केवळ अमेरिकेसाठी उपलब्ध होतं. परंतु आता ते सिंगापुर, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि भारतासह काही देशांमध्येही उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. युझर्सच्या आपल्या आवाजानं कॉल आणि टेक्स्ट सेंज आणि रिसिव्ह करू शकणार आहेत. तसंच नव्या मेसेजचा लगेलच रिव्ह्यूदेखील करता येणार आहे. ही सर्व सुविधा नेव्हिगेशन न सोडता मिळणार असल्याची माहिती गुगलनं दिली आहे. Google असिस्टंट युझर्सला नवे मेसेज वाचून ऐकवणार आहे. जेणेकरून युझरचं लक्ष केवळ ड्रायव्हिंग करण्याकडेच असेल. अँड्रॉईड युझर्सला इनकमिंग कॉलसाठी अलर्ट्सही मिळते. तसंच युझर्स व्हॉईस कमांडनं हे कॉल रिसिव्ह किंवा कट करू शकतात. गुगलच्या म्हणण्यानुसार या ड्रायव्हिंग मोडचा वापर करणं सोपं असणार आहे. युझर्सला गुगल मॅपवर कोणत्याही डेस्टिनेशनसाठी नेव्हिगेशन ऑन ठेवावं लागंल. त्यानंतर त्यावर ड्रायव्हिंग मोडचं पॉपअप येईल. त्यानंतर त्यावर टॅप करावं लागेल. यासाठी युझरला आपल्या अँड्रॉईड फोनमधील असिस्टंट सेटिंग्समध्ये जावं लागेल. तसंच हे गुगल ओपन असिस्टंट सेटिंग्स अशी कमांड द्यावी लागेल. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनमध्ये जाऊन ड्रायव्हिंग मोड सिलेक्ट करून ऑन करावा लागेल. हे फीचर सध्या ४ जीबी रॅम आणि अँड्रॉईड व्हर्जन ९ पेक्षा वरच्याच फोनसाठी असेल. (टीप : गाडी चालवताना सुरक्षेसाठी शक्यतो फोनचा वापर टाळावा.) टॅग्स :गुगलकारgooglecar