तुमची मुलं ऑनलाईन काय करतात? Google ठेवणार तुमच्या मुलांना इंटरनेटवरील ‘घाणी’ पासून दूर By सिद्धेश जाधव | Published: February 24, 2022 01:28 PM 2022-02-24T13:28:19+5:30 2022-02-24T13:36:09+5:30
गेल्या काही वर्षांत नाईलाज असतानाही अनेक पालकांना आपल्या मुलांच्या हातात स्मार्टफोन द्यावा लागला. त्यामुळे मुलं इंटरनेटवर काय बघतात याची चिंता सतत लागलेली असते. यासाठी तुम्ही Google च्या एका अॅपची मदत घेऊ शकता. हल्लीची मुलं स्मार्टफोन हातातून सोडत नाहीत. या सवयीमुळे अनेक पालकांची चिंता वाढली आहे. स्मार्टफोनवर मुलं यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि अन्य अनेक अॅप्स वापरतात.
तुमच्या समोर असलेल्या मुलांवर लक्ष ठेवता येतं. परंतु मुलं नजरेआड गेल्यावर काय करावं ते कळत नाही. तसेच काही मुलं सर्च हिस्ट्री देखील डिलीट करतात. त्यामुळे त्यांच्या ऑनलाईन अॅक्टिव्हिटीची माहिती मिळत नाही.
अशा पालकांची मदत करण्यासाठी तसेच अन्य कुटुंबीयांची ऑनलाईन सुरक्षा करण्यासाठी गुगलनं एक अॅप सादर केलं आहे. या अॅपच्या मदतीनं तुम्ही सहज तुमच्या मुलांच्या स्मार्टफोनवरील अॅक्टिव्हिटीजची माहिती घेऊ शकता.
Google Family App Google नं या अॅपची निर्मिती मुलांनी इंटरनेटचा योग्य वापर करावा यासाठी केली आहे. तुमच्या छोट्या किंवा किरशोरवयीन मुलांसाठी तुम्ही फॅमिली लिंक अॅपच्या मदतीनं इंटरनेट वापरण्याचे नियम बनवू शकता. हे अॅप तुमच्या मुलांच्या फोनमध्ये इंस्टॉल करून तुम्ही अॅक्सेस घेऊ शकता.
अॅक्टिव्हिटीजवर ठेवता येणार लक्ष अॅपमधून तुमची मुलं कितीवेळ स्मार्टफोन वापरतात ते समजेल. तसेच कोणते अॅप्स जास्त वापरले जात आहेत याची देखील माहिती मिळेल. एखाद अॅप इंस्टॉल करून डिलीट करण्यात आलं आहे कि नाही याची देखील माहिती मिळेल.
अॅप्स बॅन तुम्ही मुलांच्या स्मार्टफोनमधील नको असलेलं अॅप बॅन करू शकता. यासाठी देखील गुगलनं फिचर या अॅपमध्ये दिलं आहे.
टाइम लिमिट मुलांनी स्मार्टफोन किती वेळ वापरावा याची मर्यादा देखील तुम्ही ठरवू शकता. अॅपमध्ये सेट केलेल्या टाइम लिमिट पेक्षा जास्त वेळ स्मार्टफोन वापरल्यास स्मार्टफोन लॉक होईल.
फोन लॉक मुलं जास्त वेळ स्मार्टफोन वापरत असतील तर तुम्ही या अॅपच्या मदतीनं त्यांचा फोन लॉक करू शकता. लॉक केल्यानंतर तुमच्या परवानगी शिवाय त्यांना स्मार्टफोन वापरता येणार नाही.
लोकेशन या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मुलांच्या लोकेशनची माहिती मिळेल. फक्त अॅपवर लोकेशन मोड ऑन ठेवावा लागेल. या फिचरमुळे मुलं कुठं आहेत याची चिंता दूर होईल.