गुगल मॅपचे भारतीयांसाठी नवे फीचर; आता प्रवास करताना उडणार नाही गोंधळ By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 04:20 PM 2024-07-26T16:20:18+5:30 2024-07-26T16:33:05+5:30
Google Maps Flyover Alert Feature: आपला प्रवास अधिक सोपा करण्यासाठी आता सर्वजण गुगलवर मोठ्या प्रमाणात अवलंबून झालो आहोत. एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असो किंवा असो किंवा एखाद्या खाद्यपदार्थाचे ठिकाण शोधायचे असो,आज गुगलला खूप महत्त्व आहे. गुगल मॅपचे नवीन फीचर भारतात रिलीज करण्यात आले आहे. गुगल मॅप काही खास फिचर घेऊन येत आहे, ज्यामुळे तुमचे ड्रायव्हिंग, खाणे, एक्सप्लोरिंग अनुभव सुधारणार आहे.
आता गुगल मॅप वापरताना आता उड्डाण पूल आल्यास त्याचा वापर करावा की नाही हे सुद्धा मॅपमध्ये दाखवलं जाणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने भारतीय युझर्सकडून या फिचरची मागणी केली जात होती.
आता तुमचा प्रवास सुकर होणार आहे. कारण आता गुगल मॅप रस्त्यांची रुंदीही सांगेल. रस्ता अरुंद झाल्यास, तो तुम्हाला सावध करेल आणि ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी पर्यायी मार्ग देखील देईल. उड्डाणपुलावरून प्रवास करा किंवा 'फ्लायओव्हर कॉलआउट' यातलं अंतरही गुगल मॅप दूर करणार आहे.
गुगल मॅपतर्फे भारतात एकूण ६ नवीन फिचर्स रिलीझ करण्यात आले आहेत, ज्यामध्ये AI चा वापर करण्यात आला आहे. यामध्ये फ्लाय ओव्हर अलर्ट, ईव्ही चार्जिंग स्टेशनची माहिती, मेट्रोचे तिकीट अशा गोष्टींचा समावेश आहे.
सध्या, हे फिचर ८ शहरांससाठी जारी करण्यात आले आहे, ज्यात हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, इंदूर, भोपाळ आणि भुवनेश्वर इत्यादींचा समावेश आहे.
भारतात कार चालवताना गुगल मॅपचा वापर करताना फ्लायओव्हरच्या वेळी अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे गुगल मॅपचे हा फ्लायओव्हर अलर्ट खूप उपयुक्त ठरू शकतात.
Google ने ONDC आणि Namma Yatri सोबत भागीदारी केली आहे. यामुळे भारतीय युजर्संना मेट्रो तिकीट खरेदी करता येणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स तिकिटे खरेदी करू शकतील आणि गुगल मॅपवरून पैसेही देऊ शकतील. यासाठी कोणत्याही रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.