व्हिडीओ बघत सहभागी व्हा Google Meet मध्ये; ऑनलाइन मीटिंगची मजा वाढवण्यासाठी आले अनेक फीचर्स By सिद्धेश जाधव | Published: April 1, 2022 06:00 PM 2022-04-01T18:00:35+5:30 2022-04-01T18:08:08+5:30
Google नं आपल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म, Google Meet वर अनेक नवीन फिचर एका नव्या अपडेटच्या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे मिटिंग सुरु असतानाही इतर कामेही ब्राऊजरमध्ये करता येतील. कोविड -19 चे निर्बंध हटवण्यात आले असले तरी अजूनही काही कंपन्या हायब्रीड वर्किंग करत आहेत. त्यामुळे ऑनलाईन मिटींग्स काही बंद झालेल्या नाहीत पण त्यात सुधार आणण्याचे प्रयत्न Google Meet करत आहेत. एका अपडेटमधून गुगल मीटमध्ये अनेक नवीन फिचर आले आहेत.
रिअॅक्शन्स गुगल मीटमध्ये आता इन-मीटिंग रिअॅक्शन्स देता येतील. यात थम्स अप, हार्ट, मोठ्यानं हसणं, थम्स डाऊन, सरप्राइज आणि टाळ्यांसह काही निवडक इमोजीजचा समावेश आहे. सेटिंग मेनूमधून या इमोजी बदलता पण येतील. या प्रतिक्रिया सहभागी युजर्सच्या व्हिडीओ टाईल्स किंवा नावातून वर येताना दिसतील.
पिक्चर-इन-पिक्चर मोड गुगल मीटमध्ये पिक्चर-इन-पिक्चर मोड (PiP mode) मिळणार आहे. क्रोम ब्राउजर वर सुरु असलेल्या मीटमध्ये पिक्चर-इन-पिक्चर मोड मिळेल. त्यामुळे प्रेजेंटर्स आणि मल्टीटास्कर्सना वेगवेगळ्या टॅब आणि विंडोवर नेव्हिगेट करताना मीटिंगवर एका फ्लोटिंग विंडोमधून लक्ष ठेवता येईल.
मीट इन डॉक्स, शीट्स आणि स्लाईड्स येत्या काही आठवड्यांमध्ये मीट थेट डॉक्स, शीट्स आणि स्लाईड्सवर देखील येईल. यामुळे गुगल मीट युजर्स त्वरित एखादी मीटिंग सुरु करून एखाद्या डॉक्युमेंट, स्प्रेडशीट किंवा प्रेजेंटेशनमध्ये घेऊन जाऊ शकतात. आणि ती फाईल प्रेजेंट करू शकतात.
कंपेनियन मोडमध्ये सुधार गुगलनं कंपेनियन मोडमध्ये सुधार करण्याची घोषणा केली आहे. आगामी काळात इन-रूम मीटिंग अटेंडीजना लॅपटॉप कॅमेऱ्याद्वारे स्वतःची व्हिडीओ टाइल जोडता येईल.
इतर फीचर्स यावर्षीच्या अखेरपर्यंत लाईव्हस्ट्रीममधील लोकांना Q&A आणि पोल्समध्ये सहभाग घेता येईल. कंपनी मीटिंग होस्ट्कोना मीट अॅक्टिव्हिटीज टॅबमधून थेट यूट्यूबवर स्ट्रीम करता येईल. तसेच गुगल मीटमध्ये ऑप्शनल क्लाइंट-साइड एन्क्रिप्शन देखील देण्यात येईल.