गुगल Tiktok ची 'टांग' खेचणार; छोट्या व्हिडीओंसाठी अ‍ॅप आणले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 11:28 AM2020-02-01T11:28:32+5:302020-02-01T11:33:42+5:30

गेल्या 2 वर्षांत टीकटॉकने जगभरात धुरळा केला आहे. भारतीय अबालवृद्धांना मजेशीर व्हिडीओंचे वेडच लावले आहे. आता याच टीकटॉकला तगडा प्रतिस्पर्धी मिळाला आहे. गुगलने Tangi नावाचे अ‍ॅप आणले आहे.

टँगी या अ‍ॅपद्वारे छोटे क्रिएटीव्ह व्हिडीओ अपलोड करता येणार आहेत. यामध्ये युजरना नवीन गोष्टी शिकायला मिळणार असून हे व्हिडीओ मित्रांसोबतही शेअर करता येणार आहेत.

हे अ‍ॅप सध्या वेबसाईट आणि अ‍ॅपल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. टँगी अ‍ॅप अँड्रॉईडसाठी कधी उपलब्ध केले जाईल याची माहिती देण्यात आलेली नाही.

Tangi चा इंटरफेस दिसायला जवळपास पिंटरेस्ट आणि इन्स्टाग्रामसारखाच आहे. यामध्ये एक सर्चबार देण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही खास विषय सर्च करू शकता.

टँगीमध्ये तुम्ही 60 सेकंदापर्यंत व्हिडीओ अपलोड करू शकता. याशिवाय एखाद्या व्हिडीओवर कमेंट टाकण्याचाही पर्याय मिळणार आहे.

व्हिडीओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला ट्राय इटवर क्लिक करावे लागणार आहे. हे व्हिडीओ पाहण्यासाठी तुम्हाला एक अकाऊंट बनवावे लागणार आहे.

हे अ‍ॅप अशा लोकांसाठी बनविण्यात आले आहे, ज्यांच्याकडे काहीतरी क्रिएटीव्ह करण्याच्या कल्पना आहेत, पण त्यांना यासाठी प्लॅटफॉर्म मिळत नाही.

यामध्ये अनेक कॅटगरी आहेत.

आर्ट, कुकिंग, फॅशन, लाईफस्टाईल आणि ब्युटी अशा काही कॅटॅगरी आहेत.