भन्नाट...गुगलचे ईअरफोन येणार; समोरच्याचे ऐकून तत्काळ भाषांतर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 11:06 AM2019-10-05T11:06:33+5:302019-10-05T11:09:59+5:30

पुढील आठवड्यात जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगल भन्नाट हेडफोन आणणार आहे. कॅलिफोर्नियामध्ये गुगलच्या एका इव्हेंटमध्ये गुगल पिक्सल 4 स्मार्टफोन लाँच होणार आहे. यावेळी हे ईअरफोनही लाँच करण्यात येतील.

गुगलने 2017 मध्ये पहिला वायरलेस ईअरफोन पिक्सल बड लाँच केला होता. यंदा कंपनी याचे पुढील व्हर्जन लाँच करणार आहे. हे हेडफोन सध्याच्या अॅपलच्या एअरपॉडला टक्कर देऊ शकतात. नव्या पिक्सल बड २ मध्ये गुगल ट्रान्सलेट अॅपची सुविधा मिळणार आहे. याद्वारे युजर रिअल टाईम ट्रान्सलेट करू शकणार आहेत.

9toGoogle च्या रिपोर्टनुसार गुगल या सेकंड जनरेशन पिक्सल बडला न्यूयॉर्कमध्ये गुगल हॉर्डवेअर इव्हेंटमध्ये लाँच करेल. सध्यातरी हे बड ट्रुली वायरलेस ईअरफोन असतील किंवा पहिल्या जनरेशनसारखेच वायरचे असतील याबाबत खुलासा झालेला नाही.

पिक्सल 4, 4 एक्सएलसह नेक्स्ट मिनी स्मार्ट स्पिकर आणि पिक्सल बुक लॅपटॉप लाँच करण्यात येणार आहे. पहिल्या जनरेशन बड्सची किंमत 11300 रुपये होती.

नुकतेच मायक्रोसॉफ्टने असे इअरफोन लाँच केले आहेत. तर अॅमेझॉननेही अॅलेक्सा बड्स लाँच करण्याची घोषणा केली आहे.