तुमचा फोन हॅक झालाय ? मग असे तपासून पाहा ! नुकसान होण्यापासून सावध रहा By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 07:42 AM 2024-02-22T07:42:14+5:30 2024-02-22T07:53:14+5:30
स्मार्टफोन असो वा लॅपटॉप हॅकिंगची समस्या जिकडेतिकडे आढळते. सेलिब्रेटी असो वा सर्वसामान्य सर्वांना याचा फटका बसला आहे. मोठे आर्थिक नुकसान आणि मनस्ताप सहन करावा लागला आहे. मोठे आर्थिक नुकसान आणि मनस्ताप सहन करावा लागला आहे. असा हल्ला कधीही कुणाच्याही डिव्हाईसवर होऊ शकतो आणि क्षणात मोठे नुकसान होऊ शकते. हॅकिंगच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे. खबरदारी म्हणून काही बाबींचे पालन करणे गरजेचे आहे. फोनचे हॅकिंग झाले आहे की नाही, याची पडताळणी केली पाहिजे. याची खातरजमा पुढील मार्गांनी करता येते.
बॅटरी लाइफ कमी होणे- नेहमी बराच काळ चालणारी बॅटरी अचानक लवकर डिस्चार्ज होऊ लागते. फोन हॅक झाल्यास अनेक हेरगिरी करणाऱ्या ॲप्स छुप्या पद्धतीने सुरु असतात. त्यासाठी बॅटरीचा वापर होत असतो. अशावेळी फोन तातडीने तज्ज्ञाला दाखवावा.
नको असलेले ॲप्स- अनेकदा तुम्हाला नको असलेल्या ॲप्स फोनमध्ये डाऊनलोड होत असतात. तुमच्या परवानगीशिवाय त्या इन्स्टॉल झालेल्या असतात. यातून हॅकिंगचा प्रयत्न वा हेरगिरी होऊ शकते. अशा ॲप्सवर सतत नजर ठेवली पाहिजे.
डेटा वापर खूप वाढणे- तुमचा फोन ट्रॅक होत असल्याने अधिकचा डेटाचा वापर केला जात असतो. अशावेळी सतर्क झाले पाहिजे. डिव्हाइस खराब होणे
डिव्हाइस खराब होणे - फोन हॅक झाल्यास अचानक स्क्रीन फ्लॅशिंग होणे, फोन सेटिंग आपोआप बदलणे, फोन अचानक बंद पडणे असे प्रकार होऊ लागतात.
फोन गरम होणे - हेरगिरी ॲप तुमच्या डिव्हाइसचे लोकेशन ट्रॅक करीत असतात. त्यात जीपीएसचाही वापर होत असतो. यामुळे हार्डवेअरवर कमालीचा दबाव येत असतो व फोन प्रमाणाबाहेर तापत असतो.
ब्राउजिंग हिस्ट्री तपासणे - फोनची ब्राउजिंग हिस्ट्री नेहमी तपासावी. यामुळे ट्रॅकिंग करणारी किंवा हेरगिरी करणारी एखादी ॲप्लिकेशन डाऊनलोड झाली आहे की काय, याची माहिती मिळू शकते. त्या वेबसाईटची माहितीही मिळते.
कॉलिंगवेळी सतत येणारे आवाज - काही हेरगिरी ॲप कॉल रेकॉर्ड करीत असतात. कॉल केला असता बॅकग्राऊंडमध्ये सातत्याने आवाज येत असल्यास समजून घ्यावे की फोन हॅक झालेला आहे.