फेसबुकचा CEO मार्क झुकरबर्गचं आलिशान घर पाहिलंत का? जबरदस्त सुविधा अन् बरंच काही... By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 02:14 PM 2021-09-29T14:14:59+5:30 2021-09-29T14:20:04+5:30
फेसुबकचा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग साध्या राहणीसाठी ओळखला जातो. मग त्याचं घर कसं असेल याबाबतही तुम्हाला उत्सुकता असेल तर या फोटोंमधून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. झुकरबर्गच्या घरात काम करण्यासाठी रोबोट आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा असल्याचं सांगितलं जातं. मार्क झुकरबर्गचं घर तंत्रज्ञानानं सज्ज असलेलं असलं तरी त्याचं डिझाइन आणि इंटेरिअर पर्यावरणपूरक राहिल याची काळजी घेण्यात आली आहे. झुकरबर्गची पत्नी Priscilla Chan हिच्या नावावर असलेल्या Palo Alto हाऊची एक झलक पाहून घेऊयात...
खरंतर अब्जाधीशांच्या तुलनेत Palo Alto बेस घराची किंमत अत्यंत कमी सांगितली जाते. हे घर ५,६१७ स्वेअर फूटांचं असून ते झुकरबर्गच्या लग्नाआधीच २०११ साली खरेदी करण्यात आलं होतं. Crescent Park हाऊसमध्ये सॉल्टवॉटर पूल, ग्लास-इन सन रुम, पाच बेडरुम आणि पाच बाथरुम आहेत.
झुकरबर्गचं घर Menlo Park येथील फेसबुक कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. १० मिनिटांच्या कार ड्राइव्हनं मार्क आपल्या कार्यालयात पोहोचू शकतो. घराबाहेर खूप मोठी मोकळी जागा देखील आहे.
बाथरुममध्ये हिडेट फ्लोअरचा वापर करण्यात आला असून डॉप शॉकिंग टब मार्बलनं तयार करण्यात आलेला आहे. इंटेरिअरमध्ये ट्रेडिशनल फर्निचरचा वापर करण्यात आला आहे.
घराबाहेरील जागेचा देखील अतिशय हुशारीनं वापर करण्यात आला आहे. यात छानशी बाग आणि त्यावर सॉल्टवॉटर पूल तयार करण्यात आला आहे.
यासोबतच बॅकयार्डमध्ये वॉटरफॉल क्रेस्टेड पाँड देण्यात आला आहे. या जागेचा वापर पार्टी आणि तर कार्यक्रमांसाठी केला जातो.
घरातील मास्टर बाथरूम सर्वाधिक आलिशान जागेपैकी एक आहे. यात आकर्षक डिझाइन आणि लाइट्समुळे एका शानदार स्पाचा फील देणारं आहे.
टेक आणि सॉफ्टवेअर क्षेत्राशी निगडीत असलेल्या झुकरबर्गच्या घरात आर्टिफिशल इंटेलिजेंस असिस्टंट देखील आहे. या रोबोचं नाव जार्विस असं ठेवण्यात आलं आहे.
पावरफुल इमॅजिंग आणि व्हाइस सेन्सिंगच्या माध्यमातून दरवाजावर आलेल्या व्यक्तीला अतिशय सहजपणे हा रोबो ओळखतो.
लग्नानंतर झुकरबर्गनं आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर देखील विकत घेतला. आसपासची एकूण चार घरं खरेदी करण्यासाठी झुकरबर्गनं ३० मिलियन डॉलरहून अधिक खर्च केला.