how to activate airtel wifi calling feature on android and apple iphone smartphones
नेटवर्क नाहीये, टेन्शन नाही; Airtel युझर्सना आता 'ही' पद्धत वापरून करता येईल कॉलिंग By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 08:56 PM2021-03-13T20:56:27+5:302021-03-13T21:04:10+5:30Join usJoin usNext Airtel Calling : पाहा यासाठी काय करावं लागेल सध्या देशातील दूरसंचार कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू आहेत. आशातच देशातील दिग्गज कंपनी एअरटेलच्या ग्राहकांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. अनेकदा आपल्याला घरात किंवा कार्यालयात नेटवर्कची समस्या जाणवत असते. परंतु अशा परिस्थितीत वायफाय कॉलिंगच्या (WiFi Calling) सुविधेचा मोठा फायदा होतो. याच सुविधेचा वापर करत ग्राहकांना आता वॉईस कॉलिंग करणं शक्य आहे. Airtel च्या वायफाय कॉलिंग सेवेचा वापर करण्यापूर्वी तुमचा मोबाईल या सेवेला सपोर्ट करतो हा हे तुम्हाला पाहावं लागेल. यासाठी तुम्ही https://www.airtel.in/wifi-calling या संकेतस्थळावर जाऊन तुमचा स्मार्टफोन या सेवेला सपोर्ट करतो का हे पाहावं लागेल. जर तुमच्या स्मार्टफोनचं नाव या यादीत असेल तर तुम्हाला या सेवेचा लाभ घेता येईल. यासाठी सर्वप्रथम तुन्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावं लागेल. त्यानंतर SIM Card & Mobile Networks ऑप्शन ओपन करा. त्यानंतर सिमकार्ड सेटिंग्समध्ये जाऊन एअरटेल सिम सिलेक्ट करा. त्या ठिकाणी तुम्हाला WiFi Calling असा ऑप्शन दिसेल तो अनेबल करा. हा ऑप्शन अनेबल झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तरी तुम्ही कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. ज्या ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो. आयफोन युझर्सनाही हा ऑप्शन अनेबल करता येई शकतो. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सेटिंग्समध्ये जावं लागेल. त्यानंतर मोबाईल डेटा हे ऑप्शन सिलेकर्ट करून एअरटेल सिम हे ऑप्शन सिलेक्ट करा. त्या ठिकाणी तुम्हाला Wi-Fi कॉलिंगचं ऑप्शन दिसेल. ते अनेबल केल्यानंतर तुम्हाला वायफाय कॉलिंगचा लाभ घेता येईल.टॅग्स :तंत्रज्ञानएअरटेलवायफायस्मार्टफोनtechnologyAirtelWiFiSmartphone