How To Increase Wifi Speed: वाय-फायचा स्पीड आणि रेंज वाढवायची आहे का? मग या गोष्टींची काळजी घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 20:43 IST2021-12-07T20:30:46+5:302021-12-07T20:43:38+5:30
इंटरनेट कनेक्शन सध्या खूप महत्वाचं झालं आहे. यासाठी लोक मोबाईल इंटरनेटच्या ऐवजी जास्त विश्वास वाय-फायवर दाखवतात. त्यामुळे वाय-फाय राउटर हा घरातील महत्वाचा डिवाइस ठरतो. परंतु हा डिवाइस देखील दगा देऊ शकतो. कधी कधी चांगला प्लॅन घेऊन देखील कमी स्पीड मिळतो. यामागे राऊटरची जागा आणि स्थिती देखील खूप महत्वाची ठरते. आज आपण राऊटरची जागा आणि त्यांच्या अँटिनाच्या पोजिशन्सचा इंटरनेट स्पीडवर कसा परिणाम होतो आणि त्यावर कोणते उपाय करता येतील ये बघू.

वाय-फाय राउटर जमिनीवर ठेऊ नका
वाय-फाय राउटर जमिनीपासून थोड्या वर उंचीवर ठेवावा. कारण घरातील डिव्हाइसेस देखील जमिनीच्या उंचीवर नसतात. त्यामुळे राउटर जमिनीवर ठेवणं टाळलं पाहिजे.
राउटर समोर अडचण नसावी
राउटर समोर वस्तूंची किंवा भिंतीची अडचण नसावी. त्यामुळे सिग्नल प्रभावित होतो आणि चांगला इंटरनेट स्पीड मिळत नाही. शक्य असल्यास मोकळ्या ठिकाणी राउटर ठेवावा.
इलेक्ट्रॉनिक गॅजेटपासून दूर ठेवा
वाय-फाय राउटरच्या जवळ इलेक्ट्रॉनिक गॅजेट असू नये. यात टीव्ही, ब्लूटूथ हेडसेट, फ्रीज सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे तुमचा स्पीड आणि सिग्नल वाढण्यास नक्कीच मदत होईल.
वाय-फायवरील अँटीना सरळ ठेवावे
राउटरचे अँटिना अड्जस्ट करून सिग्नल सुधारे ठीक करता येतो. अनेकदा हे अँटीना झुकलेले असतात तर त्याऐवजी सरळ ठेऊन चांगला सिग्नल मिळवावा.
वाय-फाय राउटरचं फर्मवेयर अपडेट करावं
आपण मोबाईल, लॅपटॉप सतत अपडेट करतो, परंतु वाय-फाय राउटरला देखील अपडेट येतात हे विसरतो. त्यामुळे सतत चेक करून राउटरचं फर्म वेयर अपडेट करावं, त्यामुळे स्पीड सुधारू शकतो. तसेच राउटरची सुरक्षा वाढते.