How To Open E Aadhaar Card Download Pdf Use 8 Digit Password For Opening It
E-Aadhaar Card ची पीडीएफ फाईल ओपन करण्यासाठी पाहिजे 8 अंकी पासवर्ड, अशी करू शकता ओपन... By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 01:09 PM2021-02-07T13:09:45+5:302021-02-07T14:06:11+5:30Join usJoin usNext E Aadhaar Card PDF Password : 'आधार कार्ड' हे देशातील सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र बनलेले आहे. दैनंदिन जीवनात अनेक महत्त्वाच्या व्यवहारांसाठी आधार कार्ड गरजेचे असते. अगदी बँत खात्यापासून ते पासपोर्टपर्यंत सर्वत्रच या आधार कार्डची गरज भासते. ज्याचा वापर अनेक सेवांसाठी करण्यात येत आहे, त्यामुळे सध्या आधार कार्ड खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत सतत आपल्याजवळ आधार कार्ड असणे किंवा प्रत्येकवेळी सोबत घेऊन जाणे शक्य नसते. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाइन ई-आधार कार्ड म्हणजेच आधारची डिजिटल कॉपी डाउनलोड करण्यास UIDAI ने (युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया) परवानगी दिली आहे. जर तुम्हाला आपल्या सोयीसाठी E Aadhaar Card Download करुन फोनमध्ये ठेवायचे असेल तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे युजर्सला ई-आधार कार्डची पीडीएफ फाइल ओपन करण्यासाठी 8 अंकी पासवर्ड आवश्यक आहे. पासवर्डशिवाय तुम्हाला पीडीएफ फाइल ओपन करता येणार नाही. युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाची (यूआयडीएआय) वेबसाइट uidai.gov.in वरील माहितीनुसार, आधार कार्डाची ई-कॉपी ओपन करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा पासवर्ड असतो, तो वेग-वेगळा असतो. तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की तुमच्या ई-आधार कार्डचा पासवर्ड काय आहे आणि तुम्ही पीडीएफ फाईल कशी उघडू शकता, मग जाणून घेऊया... ज्या लोकांना पासवर्ड माहीत नाही त्यांच्या मदतीसाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर उदाहरण स्वरूपात माहिती देण्यात आली आहे. पीडीएफ फाईल ओपन करण्यासाठी नावाची पहिली चार अक्षरे आणि जन्माचे वर्ष म्हणजे तुमचा जन्म कोणत्या वर्षी झाला, ते प्रविष्ट करावे लागेल. यावेळी लक्ष देण्याची बाब म्हणजे, नावाचे जे सुरवातीची चार अक्षरे असतील ती मोठ्या अक्षरात म्हणजेच ब्लॉक लेटर्समध्ये लिहावी लागतील. उदाहरणार्थ...तुमचे नाव Sai Kumar आणि जन्म वर्ष 1980 आहे, तर तुमच्या पीडीएफ फाईलचा पासवर्ड SAIK1980 असा असेल.टॅग्स :आधार कार्डतंत्रज्ञानAdhar Cardtechnology