YouTube वर व्हिडीओ पाहताना बफर होतो? 'या' ट्रिक्स ठरतील फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 13:43 IST2019-09-09T13:08:33+5:302019-09-09T13:43:13+5:30

YouTube वर अनेक जण आपल्याला हवे असलेले व्हिडीओ पाहत असतात. मात्र अनेकदा मोबाईल नेटवर्क खराब असल्याने व्हिडीओ प्ले होताना अडचणी येत असतात.
YouTube वर व्हिडीओ पाहताना बफर होत असेल तर काही ट्रिक्स आहेत ज्याच्या मदतीने युजर्स खराब नेटवर्क असताना देखील आरामात व्हिडीओ पाहू शकतात.
सर्वप्रथम आपल्या फोनमधील अथवा डेस्कटॉपवरील क्रोम बाऊजरमध्ये जा. मेन्यू ऑप्शनमध्ये देण्यात आलेल्या तीन लाईनवर टॅप करा.
फोनच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन क्लियर ब्राऊजिंग डेटावर टॅप करा. डेस्कटॉपवर युट्यूब असेल तर मोर टूल्सवर जाऊन क्लियर ब्राऊजिंग डेटावर टॅप करा.
अँड्रॉईड, मॅक, पीसी युजर्स डेटा डिलीट करण्यासाठी टाईम रेंज सिलेक्ट करू शकतात. मात्र आयफोनवर हे उपलब्ध नाही.
कूकीज आणि साइट डेटा आणि कॅश्ड इमेज अँड फाईल्सचा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर क्लियर डेटावर क्लिक करा.
व्हिडीओ क्वालिटी बदलण्यासाठी युट्युबच्या खाली देण्यात आलेल्या गियरवर क्लिक करा.
व्हिडीओसाठी कमी रेजॉल्यूशन सिलेक्ट करा. त्यानंतर व्हिडीओ पहिल्यापेक्षा अधिक वेगाने प्ले होईल. मात्र डेस्कटॉपसाठी हे फीचर उपलब्ध नाही.