iPhone-iPad चा पासवर्ड विसरलात? काही मिनिटांत करा रिसेट, जाणून घ्या सोप्पी पद्धत By सिद्धेश जाधव | Published: December 17, 2021 01:17 PM 2021-12-17T13:17:51+5:30 2021-12-17T13:27:55+5:30
iPhone-iPad चा पासवर्ड रिसेट करण्यासाठी कंपनीनं नवीन फिचर सादर केलं आहे. त्यामुळे आता काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करून तुमचा डिवाइस अनलॉक करता येईल. iPhone आणि iPad वरील पासवर्ड रिसेट करणं आता आधीपेक्षा सोप्प झालं आहे. Apple नं नवीन ‘सिक्योरिटी लॉकाआऊट’ फीचर सादर केलं आहे. या नवीन फीचरमुळे आता लॉक्ड iPad किंवा iPhone कंप्यूटरला न जोडता रिसेट करून डेटा डिलीट करता येईल. यासाठी तुमच्या डिवाइसमध्ये iOS 15.2 आणि iPad OS 15.2 असणं आवश्यक आहे.
कंपनीनं नवा अपडेट जारी केला आहे, त्यामुळे लॉक्ड आयफोन किंवा आयपॅडवर चुकीचा पासवर्ड अनेकदा टाकल्यावर नवीन ऑप्शन मिळेल. परंतु डिवाइस रिसेट करण्यासाठी तुमचा डिवाइस वायफाय नेटवर्कशी कनेक्टड आसन आवश्यक आहे.
मॅक किंवा पीसीशी कनेक्ट केल्याशिवाय याआधी आयफोन किंवा आयपॅड रिसेट करता येत नव्हते. नव्या फिचर वापर करून देखील मालकाशिवाय इतर कोणीही आयफोन किंवा आयपॅड रिसेट करू शकणार नाही.
लॉक्ड आयपॅड किंवा आयफोन रिसेट करण्यासाठी अॅप्पल आयडी तसेच पासवर्ड लक्षात असणे आवश्यक आहे. त्याशिवाय ही पद्धत देखील निकामी ठरू शकते.
अनेकदा चुकीचा पासवर्ड टाकल्यावर सिक्योरिटी लॉकआउट मोड समोर येईल. त्यात Erase iPhone किंवा Erase iPad हा ऑप्शन दिसेल.
Erase iPhone किंवा Erase iPad ऑप्शन निवडल्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा अॅप्पल आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल. म्हणजे ते अकॉउंट तुमच्या डिवाइसमधून साइन आउट होईल आणि डिवाइस रिसेट होईल.
सिक्योरिटी लॉकआउट मधील रिसेटचा अर्थ असा कि तुमच्या आयफोन किंवा आयपॅडवरील सर्व डेटा डिलीट होईल. डिवाइस देखील फॅक्ट्री सेटिंग्सवर पुर्वव्रत होईल.
डिवाइसवरील डेटा हवा असेल तर या मोडचा वापर टाळावा. जर तुम्ही वेळावेळी डिवाइस डेटाचा बॅकअप घेत असाल तर या फिचरमुळे तुमचा खूप वेळ वाचेल.