how to save whatsapp status photos and video in your smartphone
WhatsApp स्टेटसमधले फोटो आणि व्हिडीओ सेव्ह करायचेत? कसं ते जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 01:06 PM2020-01-16T13:06:51+5:302020-01-16T13:14:39+5:30Join usJoin usNext स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम स्टोरीजप्रमाणे व्हॉट्सअॅपनेही WhatsApp Status हे फीचर आणलं आहे. स्टेटसमध्ये फोटो आणि व्हिडीओ अपलोड केल्यानंतर ते 24 तास असतात. मित्र-मैत्रिणींचं स्टेटस अनेकदा आवडतं किंवा ते सेव्ह करण्याची इच्छा होते. मात्र सेव्ह करण्यासाठी व्हॉट्सअॅपने कोणतही फीचर दिलेलं नाही. फोनमध्ये स्टेटस कसं सेव्ह करायचं हे जाणून घेऊया. सर्वप्रथम प्ले स्टोरवरून फोनमध्ये Google Files अॅप डाऊनलोड करा. अॅप ओपन केल्यावर टॉप राईट कॉर्नरला देण्यात आलेल्या मेन्यू ऑप्शनवर क्लिक करा. Settings ऑप्शनमध्ये जा. Show hidden files ऑन करा. Show hidden files ऑन करा. अॅपमध्ये पुन्हा जाऊन खाली देण्यात आलेल्या ब्राऊजरवर टॅप करा. टॅप केल्यावर Internal Storage मध्ये जा. WhatsApp नावाच्या फोल्डरमध्ये जाऊन Media वर क्लिक करा. Statuses असं एक फोल्डर दिसेल. त्यामध्ये आपल्या मित्रमैत्रिणींचे व्हॉट्सअॅप स्टेटस दिसतील. फोटो अथवा व्हिडीओ ओपन करायचा असल्यास नावापुढे डाऊनलोडच्या चिन्हावर क्लिक करा. अनेक ऑप्शन दिसतील. ज्यामध्ये Copy To ऑप्शन सिलेक्ट करा. Internal Storage मध्ये क्लिक करून हवे असलेले फोटो आणि व्हिडीओ फोनमध्ये सेव्ह करा.टॅग्स :व्हॉट्सअॅपतंत्रज्ञानWhatsApptechnology