सावधान! हॅकर्सना मिळू शकतो तुमच्या WhatsApp अकाऊंटचा एक्सेस, करू नका 'ही' चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 04:02 PM2024-09-05T16:02:37+5:302024-09-05T16:18:53+5:30

WhatsApp : WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. त्यामुळेच स्कॅमर्ससाठी ते मोठं व्यासपीठ आहे.

WhatsApp हा जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर एक्टिव्ह युजर्सची संख्या २.७८ अब्ज आहे. WhatsApp १८० देशांमध्ये उपलब्ध आहे.

WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. त्यामुळेच स्कॅमर्ससाठी ते मोठं व्यासपीठ आहे. विविध प्रकारे लोकांना ते आपल्या जाळ्यात अडकवून टार्गेट करू शकतात. याबाबत जाणून घेऊया...

हे करण्याचा एक मार्ग म्हणजे सोशल इंजिनिअरिंग. यामध्ये स्कॅमर तुम्हाला बोलण्यात अडकवून तुमचं WhatsApp अकाउंट हॅक करतात.

स्कॅमर लोकांना लक्ष्य करतात आणि त्यांच्याकडून व्हेरिफिकेशन कोड किंवा पासवर्ड मिळवतात. यानंतर त्यांना WhatsApp अकाऊंटचा एक्सेस मिळतो.

हॅकर्स सर्वप्रथम तुमचा मोबाइल नंबर घेऊन WhatsApp वर रजिस्टर करतात. यासाठी त्यांना फक्त तुमचा फोन नंबर हवा आहे.

WhatsApp वर लॉग इन होताच, रजिस्टर मोबाइल नंबरवर एक व्हेरिफिकेशन कोड पाठवला जातो. हॅकर्स काही मार्गाने तुमच्याकडून कोड मिळवण्याचा प्रयत्न करतील.

व्हेरिफिकेशन कोड मिळविण्यासाठी, हॅकर्स तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, ते तुम्हाला सर्वप्रथम कॉल करतील.

फोन केल्यावर एखाद्या सेवेबद्दल चर्चा करतात. कदाचित ते एखादी बँक किंवा टेलिकॉम सर्व्हिसचे प्रोव्हायडरचे रिप्रेजेंटेटिव्ह म्हणून तुमच्याशी बोलतील.

यानंतर त्यांना तुमच्याकडून व्हेरिफिकेशन कोड मिळेल. तुम्ही कोड दिल्यास, त्यांना तुमच्या अकाऊंटचा एक्सेस मिळेल.

जर तुम्हाला WhatsApp व्हेरिफिकेशन कोडच्या नावाने एसएमएस आला तर तुम्ही तो कोड कोणाशीही शेअर करू नये.