WhatsApp'ने लाँच केल भन्नाट फिचर! अॅनिमेटेड अवतार डीपी आणि स्टिकर्स तयार करा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 02:03 PM2022-12-22T14:03:11+5:302022-12-22T14:09:14+5:30

WhatsApp नेहमी भन्नाट फिचर लाँच करत असत. आता व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी अनलिमिटेड अवतार आणि स्टिकर्स लाँच केले आहे.

WhatsApp नेहमी भन्नाट फिचर लाँच करत असत. आता व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी अनलिमिटेड अवतार आणि स्टिकर्स लाँच केले आहे.

आता तुम्हाला हवे तसे अवतार आणि स्टिकर्स बनवता येणार आहेत. याची प्रक्रिया सोपी आहे. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप डीपीला तुमचे अवतार बनवू शकता. यासह डीपी आणि स्टिकर पॅक बनवू शकता. चला जाणून घेऊ याची प्रक्रिया.

सर्वात पहिल्यांदा WhatsApp ओपन करा आणि सेटींग मेन्यू मध्ये जा. यानंतर स्क्रोल डाऊन करुन Avatar ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला क्रिएट युअर अवतार ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला अनेक पद्धतीचे अवतार ऑप्शन दिसतील. या अवतारला तुम्ही स्किन, कलर टोन हेअर स्टाइल, आउटफिट बदलू शकता.जर तुम्हाला हा अवतार आवडला तर तु्म्ही तो सेव करुन ठेवू शकता.

पहिल्यांदा व्हॉट्सअॅप ओपन करा,आणि नंतर चॅट पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला स्टिकर ऑप्शनच्या इमोजी ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर उजव्या कोपर्‍यात तळाशी असलेला Add पर्याय निवडावा लागेल. यानंतर, अवतार बॅनर निवडा. त्यानंतर काही स्टेप्स वापरून अवतार तयार करता येतो.

यानंतर तुम्ही अवतार सेव करुन ठेवू शकता.याला नाव देता येते . तुम्हाला स्टिकर आवडत असल्यास, तुम्ही ते सेव करू शकता. यानंतर, Publish पर्यायावर क्लिक करा. जे चॅट ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.