रिचार्ज महागले! Jio, Airtel अन् Vi ला BSNL मध्ये पोर्ट कसे कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 05:18 PM2024-07-14T17:18:11+5:302024-07-14T18:49:29+5:30

खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे अनेक ग्राहक BSNL कडे वळत आहेत.

Jio, Airtel आणि Vodafone Idea(vi) या देशातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. जेव्हापासून या तीन खाजगी कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत, तेव्हापासून सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL चांगलीच अॅक्टिव्ह झाली आहे.

ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी BSNL स्वस्त रिचार्ज प्लॅन आणत आहे. त्यामुळे ग्राहकदेखील आता खाजगी कंपन्यांकडून BSNL मध्ये पोर्ट करण्याचा विचार करत आहेत. तुम्हालाही BSNL वर स्विच करायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळेच आता Jio, Airtel आणि Vi ;s अनेक ग्राहक BSNL कडे वळत आहेत.

या सरकारी टेलिकॉम कंपनीच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनने मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आकर्षित केले आहे. BSNLचा रिचार्ज प्लॅन इतर कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त मानला जातो, ज्यांची व्हॅलिडिटी 28 दिवसांपासून ते 365 दिवसांपर्यंत असते.

नेटवर्कच्या बाबतीत BSNL खाजगी कंपन्यांपेक्षा कमकुवत असू शकते, परंतु कंपनी आपल्या स्वस्त प्लॅनद्वारे खासगी कंपन्यांशी स्पर्धा करत आहे. BSNL ज्या किमतीत रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे, त्याच्या जवळपास दुसरी कोणतीही कंपनी नाही.

तुम्हालाही BSNL मध्ये पोर्ट करायचे असेल, तर सर्वात आधी तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये 'PORT' लिहून तुमचा 10 अंकी मोबाइल नंबर टाकावा लागेल आणि त्यानंतर स्पेस देऊन 1900 वर SMS पाठवून मोबाईल नंबर पोर्ट करण्याची विनंती करावी लागेल.

त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी तुम्हाला बीएसएनएलच्या सेवा केंद्रावर जावे लागेल. तिथे आधार कार्ड किंवा इतर आयडी, फोटो आणि बायोमेट्रिकची माहिती घेतली जाईल. यानंतर तुम्हाला नवीन बीएसएनएल सिम जारी केले जाईल. त्या बदल्यात तुमच्याकडून काही पैसे आकारले जाऊ शकतात.

Jio आणि Airtel युजर्ससाठी BSNL वर पोर्ट करण्याची प्रक्रिया सारखीच आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या नवीन नियमांनुसार, नवीन टेलिकॉम ऑपरेटरकडे जाण्यासाठी प्रतीक्षा कालावधी 7 दिवसांचा झाला आहे. म्हणजे सिमकार्ड पोर्टसाठी 7 दिवस लागतात.