बॉम्ब सारखा फुटेल तुमचा स्मार्टफोन, अशाप्रकारे वाचवा जीव आणि स्मार्टफोनही By सिद्धेश जाधव | Published: April 4, 2022 05:49 PM 2022-04-04T17:49:50+5:30 2022-04-04T18:06:51+5:30
सध्या स्मार्टफोन ब्लास्ट झाल्याच्या बातम्या अधून-मधून येत आहेत. यामध्ये अनेक स्मार्टफोन युजर जखमी देखील झाले आहेत. स्मार्टफोन ब्लास्ट होण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत असतात त्यांची माहिती आम्ही आज आणली आहे. चला जाणून घेऊया. गेल्या वर्षभरात वनप्लस नॉर्ड 2 ब्लास्ट होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्याच आठवड्यात एक बातमी आली आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्मार्टफोनमध्ये स्फोट होतो का? हा स्फोट रोखता येतो का? चला जाणून घेऊया तुमच्या प्रश्नांची उत्तरं.
निर्मितीमधील दोष स्मार्टफोनची निर्मिती करताना सर्व चाचण्या करण्याची जबाबदारी स्मार्टफोन कंपन्यांची असते. तिथेच बऱ्याचदा चूक होते आणि स्मार्टफोनचा स्फोट होतो. यात बॅटरीची टेस्टिंग न करणे स्वस्तातली बॅटरी वापरणे, या दोन गोष्टींचा मोठा परिणाम होतो.
फोन पाडणे, आपटणे फोन जेव्हा आपटला जातो किंवा पडतो तेव्हा त्याची बॅटरी हलते. बॅटरी सेलमधील बनावट बिघडते. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये शॉर्ट सर्किट आणि ओव्हरहीटिंग होऊ शकते. तसेच बॅटरीवर बाहेरून दबाव पडणार नाही याची काळजी घ्या.
रात्रभर चार्जिंग रात्रभर चार्जिंग केल्यामुळे सकाळी जरी तुम्हाला फुल्ल चार्ज स्मार्टफोन मिळत असेल, परंतु त्याची बॅटरी लाईफ मात्र डॅमेज झाली असते. विशेष म्हणजे स्वस्त स्मार्टफोन्समध्ये 100 टक्के चार्जिंग झाल्यावर करंट बंद होण्याचं फिचर मिळत नाही. त्यामुळे रात्रभर स्मार्टफोन चार्ज करू नका.
फोनला आराम मिळत नाही फोन तेव्हा गरम होतो जेव्हा प्रोसेसरवर मल्टी-टास्किंग आणि मोठ्या गेम्सचा भार येतो. त्यामुळे हेवी गेमिंग आणि मल्टी टास्किंग टाळा.
अयोग्य चार्जर स्वस्त मिळतोय म्हणून डुप्लिकेट चार्जर वापरला जातो. जो ओरिजनल चार्जरसारखं आऊटपुट देत नाही आणि स्मार्टफोनच्या बॅटरीची वाट लागते. थर्ड पार्टी चार्जरमुळे फोन ब्लास्ट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
ऊन आणि पाण्यापासून ठेवा दूर जास्त उष्णता फोनची बॅटरी खराब करू शकते. त्यामुळे फोन उन्हात ठेवणं किंवा उन्हात उभ्या असलेल्या कारमध्ये ठेवणं बॅटरीच्या स्फोट होण्यास कारणीभूत ठरू शकतं. तसेच स्मार्टफोनमध्ये पाणी देखील जाऊ देऊ नका.