नो टेन्शन! डिलीट केलेला WhatsApp मेसेज तुम्हाला वाचायचाय?, 'ही' सोपी ट्रिक करेल मदत By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 02:25 PM 2024-10-12T14:25:19+5:30 2024-10-12T14:48:53+5:30
डिलीट केलेल्या मेसेजमध्ये काय होते हे जाणून घेण्याची काही लोकांची खूप इच्छा आहे. जर तुम्हीही अशा लोकांमध्ये असाल तर तुम्हाला डिलीट केलेल्या मेसेजबद्दल अगदी सहज माहिती मिळेल. तुम्हाला डिलीट केलेले WhatsApp मेसेज देखील वाचायचे असतील तर तुम्ही आता डिलीट केलेले WhatsApp मेसेज सहज वाचू शकता.
WhatsApp वर डिलीट फॉर एव्हरीवन नावाचे फीचर येतं. या फीचरच्या मदतीने तुम्ही पाठवलेला मेसेज डिलीट करू शकता.
या फीचरनंतर अनेक लोक मेसेज पाठवतात आणि ठराविक वेळेत डिलीट करतात. असं केल्याने काही युजर्स नाराज होतात.
डिलीट केलेल्या मेसेजमध्ये काय होते हे जाणून घेण्याची त्यांची खूप इच्छा आहे. जर तुम्हीही अशा लोकांमध्ये असाल तर तुम्हाला डिलीट केलेल्या मेसेजबद्दल अगदी सहज माहिती मिळेल.
यासाठी तुम्हाला फोनमध्ये असलेली एक सेटींग ऑन करावी लागेल. तुम्हाला तुमच्या फोनमध्ये नोटिफिकेशन्स हिस्ट्री ऑन करावी लागेल. ज्यामुळे तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
अशा परिस्थितीत, एखादा WhatsApp मेसेज पाठवल्यानंतर तो डिलीट केला तरी तुम्ही तो नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये वाचू शकता.
लक्षात ठेवा की, तुम्ही नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये कोणताही ऑडिओ मेसेज, व्हिडीओ किंवा फोटो ऍक्सेस करू शकणार नाही. तुम्ही फक्त मेसेज वाचू शकता.
तुम्ही नोटिफिकेशन बारमधून थेट हिस्ट्रीवर जाऊ शकता किंवा सेटिंग्जमध्ये हा ऑप्शन ओपन करू शकता. येथे तुम्हाला २४ तासांपर्यंतची हिस्ट्री मिळेल.