अशाप्रकारे जिंका Ludo King चा प्रत्येक गेम, फॉलो करा सोप्प्या टिप्स By सिद्धेश जाधव | Published: March 14, 2022 07:28 PM 2022-03-14T19:28:34+5:30 2022-03-14T19:38:45+5:30
How To Win Every Game Of Ludo King: लॉकडाउनमधील मास्क वापरणे, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग सारख्या सवयी लोक विसरत आहेत. परंतु लुडो किंगचं व्यसन मात्र अजूनही कायम आहे. इतकं खेळूनही अनेकांना या गेम प्रत्येक वेळी जिंकता येत नाही, त्यांच्यासाठी पुढील टिप्स आणल्या आहेत. How To Win Every Game Of Ludo King: लॉकडाउनमधील लोकप्रिय गेम लुडो किंगची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. अजूनही ऑनलाइन तसेच ऑफलाइन या गेमचे डाव रंगत आहेत.
अनेकदा तुम्हाला या गेममध्ये सतत पराभवाचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुमचे पॉईंट्स कमी होतात. या गेममध्ये जिंकायचं असेल तर या गेमच्या ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे, ज्या आम्ही पुढे दिल्या आहेत.
सर्व सोंगट्या बाहेर काढून घ्या आपल्या सर्व सोंगट्या बाहेर काढणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे एक जरी सोंगटी बाद झाली तरी तुमचे डाव वाया जात नाहीत कारण तुमच्याकडे इतर सोंगट्या बोर्डवर असतात.
डाव खेळत राहा लुडो खेळताना सर्वच सोंगट्यांवर लक्ष ठेवावं. एक सोंगटी घरात नेण्यावर भर देऊ नका, सर्व सोंगट्या अॅक्टिव्ह ठेवा. ज्या सोंगट्या इतर खेळाडूंपासून लांब आहेत त्यांना पण पुढे नेत राहा. ज्या सोंगटीकडे लक्ष नसतं अशी सोंगटी प्रतिस्पर्ध्याची शिकार होऊ शकते.
प्रतिस्पर्ध्याच्या सोंगट्या बाद करायला विसरू नका लुडो खेळताना फक्त आपल्या सोंगट्या घरात पोहोचवणं महत्वाचं नसतं तर इतरांच्या सोंगट्याना घरात जाण्यापासून रोखायचं देखील असतं. त्यासाठी प्रतिस्पर्धी सोंगट्याना संधी मिळताच बाद करावं.
प्रतिस्पर्ध्यांना ब्लॉक करा विरोधी सोंगटीच्या पुढे सेफ स्पॉटवर तुमची सोंगटी ठेऊन तुम्ही प्रतिस्पर्ध्याच्या मनात भीती निर्माण करू शकता. त्यामुळे प्रतिस्पर्धी इतर सोंगट्या चालवण्यास मजबूर होतो.
घराजवळ आलेल्या सोंगट्यांच्या बाबतीत जोखीम घेऊ नका. अशावेळी आपल्या सर्वच सोंगट्या बाहेर असण्याचा फायदा होतो. जी सोंगटी घरापासून खूप दूर आहे किंवा आत्ताच बाहेर आली आहे तिच्याबाबत तुम्ही जोखीम घेऊ शकता. घराजवळ आलेल्या सोंगट्यांच्या बाबतीत जोखीम घेऊ नका. अशावेळी आपल्या सर्वच सोंगट्या बाहेर असण्याचा फायदा होतो. जी सोंगटी घरापासून खूप दूर आहे किंवा आत्ताच बाहेर आली आहे तिच्याबाबत तुम्ही जोखीम घेऊ शकता.