UPI ने पैसे ट्रान्सफर करताना अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 15:05 IST2019-05-17T15:02:46+5:302019-05-17T15:05:50+5:30

आजचा जमाना ऑनलाईनचा असल्याने सर्वच व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने केले जातात. UPI च्या माध्यमातून काही मिनिटात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवणं सहज शक्य असतं. पैशाचे व्यवहार करताना अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता ही अधिक असते.

UPI अ‍ॅपमुळे पैसे पाठवणे, खरेदी करणं सोयीचं होतं. मात्र ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं असतं. UPI ने पैसे ट्रान्सफर करताना कशी काळजी घायची हे जाणून घेऊया.

स्मार्टफोनमध्ये कोणतेही चुकीचे अ‍ॅप डाऊनलोड करू नका. असं केल्यास तुमची वैयक्तिक माहिती लीक होण्याची शक्यता अधिक असते.

UPI डाऊनलोड करताना तो अधिकृत कंपनीचा आहे की नाही ते नीट तपासून घ्या

भीम अ‍ॅपसह प्रत्येक बँकेचे मोबाईल अ‍ॅप यूपीआय (युनायटेड पेमेंट इंटरफेस) वर चालते. एमपिन सहा अंकी नंबर राहत असून तोच बहूदा ओटीपीचे काम करतो. एमपिन एखाद्यावेळी दुसऱ्याला दिल्यास त्याचा मोठा फटकाच नागरिकांना सहन करावा लागू शकतो.

एमपिन चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागल्यास तो त्याचा वापर करून त्याच्या मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करून त्या नागरिकाची आर्थिक फसवणूक करू शकतो.

बँकेतून फोन आला आहे असे सांगून अनेकदा फेक कॉल येत असतात. त्यावर बँक अकाऊंट, UPI पिन क्रमांक किंवा ओटीपी नंबरबाबत विचारणा करण्यात येते. मात्र या गोष्टी कोणासोबत शेअर करू नका.