Telegramवर तुम्हीही करत असाल 'हे' काम, तर वेळीच व्हा सावधान! नाही तर बसेल मोठा दणका By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 05:01 PM 2023-01-31T17:01:21+5:30 2023-01-31T17:18:02+5:30
टेलिग्राम अॅपला अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळाली आहे, पण... Telegram: टेलीग्राम या भारतीय अॅपला अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळवण्यात यश आले आहे. मेसेजिंग सोबतच, या अॅपवर अशी उत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी तुम्हाला खूप आवडतील.
या अॅपवर ऑनलाइन एडिटिंग तसेच उत्कृष्ट स्टेटस आणि चॅटिंग पर्याय आहेत, वेगळ्या धाटणीच्या या गोष्टी तुमचा अनुभव नक्कीच उत्कृष्ट बनवायला मदत करतील. त्यामुळे लाखो युजर्स या अॅपचा वापर करत आहेत.
पण तुम्हाला माहिती आहे का की, गेल्या काही वर्षात या अॅपचा वापर इतर कारणांमुळे अधिक वाढला आहे. त्यापैकी सर्वात मोठे कारण म्हणजे- अनेक कंपन्यांची फसवणूक करणे म्हणजे विविध गोष्टींची पायरसी (piracy).
तुम्हाला ही गोष्ट समजल्यावर आश्चर्य वाटेल की, या अॅपवर सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजेच नेटफ्लिक्स असो वा प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टार असो वा आणखी काही... साऱ्या अॅप वरील चित्रपट विनामूल्य पाहता येत आहेत. आणि याचे ओटीटी प्लॅटफॉर्मला मात्र खूप नुकसान होत आहे.
चित्रपटांचे पायरेटेड व्हर्जन या अॅपवर अनेक चॅनल्सच्या मार्फत अपलोड केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, यात चित्रपटांचा दर्जा इतका उत्तम असतो की तो चित्रपट चुकीच्या मार्गाने अपलोड करण्यात आलेचे जाणवातही नाही. त्यामुळे लोक नवे चित्रपट आणि वेब सिरीज डाउनलोड करून पाहत असल्याचे बोलले जात आहे. पण, असे करत असाल तर वेळीच सावध व्हा.
काय होऊ शकते कारवाई- एखाद्या चित्रपटाच्या किंवा वेब सिरीजच्या पायरेटेड प्रतशी संबंधित असणं हे बेकायदेशीर आहे. कदाचित तुम्ही टेलिग्रामवरून OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट डाउनलोड केला असेल, परंतु असे करणे बेकायदेशीर आहे आणि जर तुम्ही असे करताना पकडले गेलात तर तुम्हाला व्हिडिओ पायरसीसाठी थेट कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा.