मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: 'या' अँड्रॉइड यूजर्सना धोका, सरकारी संस्थेकडून इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 03:20 PM 2024-07-11T15:20:50+5:30 2024-07-11T15:27:20+5:30
हॅकर्स तुमच्या फोनला टार्गेट करून त्यातील सेन्सेटिव्ह डेटा चोरी शकतात. CERT-In या सरकारी संस्थेनं भारतीय स्मार्टफोन आणि टॅबलेट यूजर्सला सावधानतेचा इशारा दिला आहे. जुने अँड्रॉइड व्हर्जन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा इशारा देण्यात आला आहे.
CERT-In (Indian Computer Emergency Response Team)ने हा इशारा अतिमहत्त्वाचा असल्याचंही सांगितलं आहे.
CERT-In च्या म्हणण्यांनुसार अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक प्रकारची वल्नेरेबिलिटीज आढळून आली आहे. याचा फायदा सायबर अॅटॅकर उठवण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या कमरतेमुळे हॅकर्स तुमच्या फोनला टार्गेट करून त्यातील सेन्सेटिव्ह डेटा चोरू शकतात.
कोणत्या यूजर्सला आहे धोका?- Android 12, Android 13 आणि Android 14 या व्हर्जन्सच्या आधीच्या व्हर्जन्समध्ये ही कमतरता आढळून आली आहे.
कोणत्या कारणामुळे निर्माण झाली अडचण?- फ्रेमवर्क, सिस्टम, गुगल प्ले सिस्टम अपडेट्स, Kernel, आर्म कंपोनंट्स आणि क्वालकॉम क्लोज सोर्स कंपोनंट्समध्ये असलेल्या कमतरतांमुळे या वल्नेरेबिलिटीज झाल्याचं सांगितलं जात आहे.
काय आहे एजन्सीचं म्हणणं?- वल्नेरेबिलिटीजचा फायदा उचलून लोकल अॅटॅकर्स आपल्या फोनमधील सेन्सेटिव्ह डेटा चोरू शकतात.
लगेच अपग्रेड करा तुमचा फोन - जर तुम्हीही अँड्रॉइडचं जुनं व्हर्जन वापरत असाल तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या फोनमध्ये अँड्रॉइडचे लेटेस्ट व्हर्जन अपग्रेड करणं आवश्यक आहे.