Infinity-O display launched Samsung Galaxy A8s; The corner camera
इन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 08:05 PM2018-12-10T20:05:21+5:302018-12-10T20:11:06+5:30Join usJoin usNext दक्षिण कोरियाची प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगने Samsung Galaxy A8s हा इन्फिनिटी-ओ डिस्प्ले असलेला जगातल पहिला फोन चीनमध्ये आज लाँच केला आहे. याचबरोबर कंपनीने Galaxy A8s FE हे महिलांसाठी असलेल्या फोनचे व्हर्जन आणले आहे. Samsung Galaxy A8s मध्ये उजव्या बाजुला डिस्प्लेमध्येच कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने अद्याप या मोबाईलच्या किंमतीबाबत काहीही सांगितले नाही, तसेच भारतात हा मोबाईल कधी लाँच होईल याबाबतही सांगितलेले नाही. Galaxy A8s मध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच क्वालकॉम स्नैपड्रैगन 710 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी Kryo 360 CPU आणि Adreno 616 GPU देण्यात आला आहे. Galaxy A8s मध्ये दोन मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस तर दुसऱ्या मॉडेलमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. Galaxy A8s मध्ये अँड्रॉईड 8.1 ओरियो देण्यात आली आहे. तसेच Samsung Experience UI 9.5 ही युआय देण्यात आली आहे. अॅल्युमिनिअम फ्रेमसह ग्लॉसी फिनिशही देण्यात आले आहे. या फोनमध्ये पाठीमागे ट्रिपल रियर कैमरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी सेन्सर 24 मेगापिक्सलचा आणि सेकंडरी सेन्सर 10 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. तिसरा सेन्सर 5 मेगापिक्सलचा आहे.