पर्सनल डेटा गोळा करण्यात Instagram चा पहिला नंबर; जाणून घ्या, तुमचा डेटा कोणतं अ‍ॅप्स किती वापरतंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 03:53 PM2021-03-23T15:53:35+5:302021-03-23T16:13:23+5:30

instagram is number 1 in app in collecting user data here is the full list : Instagram अॅप युजर्सचा 79% पर्सनल डेटा थर्ड पार्टी कंपनीला शेअर करते.

जर तुम्ही Instagram आणि Facebook अ‍ॅप्स वापरत असल्यास तर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पर्सनल (वैयक्तिक) डेटा थर्ड पार्टी कंपनीसोबत शेअर करण्याच्या प्रकरणात हे अ‍ॅप्स आघाडीवर आहे.

इंस्टाग्राम अॅप युजर्सचा पर्सनल डेटा सर्वाधिक शेअर करते. क्लाऊड स्टोरेज कंपनी pCloud यांनी ही माहिती दिली आहे. pCloud च्या मते, Instagram अॅप युजर्सचा 79% पर्सनल डेटा थर्ड पार्टी कंपनीला शेअर करते.

या डेटामध्ये खरेदीची माहिती, पर्सनल डेटा आणि युजर्सची ब्राउझिंग हिस्ट्रीचा समावेश आहे. pCloud च्या अहवालानुसार, युजर्सद्वारे संकलित केलेली माहिती 79% इतरांकडे इन्स्टाग्राम शेअर करते. म्हणजेच, पैसे कमावण्यासाठी इन्स्टाग्रामकडून तुमचा डेटा विकला जातो.

इन्स्टाग्राम स्वतःच तुमाचा 86 टक्के डेटा वापरतो. हा डेटाचा वापर फेसबुक ग्रुपची उत्पादने विक्रीसाठी केला जातो. या डेटाच्या आधारे, आपल्याला जाहिराती दर्शविल्या जातात. इन्स्टाग्रामनंतर फेसबुक अॅप डाटा शेअरिंगच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

फेसबुकद्वारे युजर्सचा 56 टक्के डेटा थर्ड पार्टी कंपनीसोबत शेअर केला जातो. कंपनी स्वतःच्या मार्केटसाठी युजर्सच्या 86 टक्के वापर करते. Signal, Clubhouse आणि Netflix सारख्या अ‍ॅप्स युजर्सटा डेटा थर्ड पार्टीसोबत शेअर करत नाही. हे अ‍ॅप्स युजर्सचा डेटा मार्केटिंगसाठी वापरत नाहीत.

pCloudने अ‍ॅप स्टोअरच्या नवीन प्रायव्हसी लेबलवर आधारित डेटा कलेक्ट केला होता. त्याच्या संशोधनानुसार, इन्स्टाग्राम आणि फेसबुक अॅप युजर्सचा डेटा सर्वात जास्त थर्ड पार्टीसोबत शेअर करते.

pCloud च्या मते, like Signal, Netflix, Clubhouse, Skype, Microsoft Teams आणि Google Classroom सारखे अ‍ॅप्स कोणताही यूजर डेटा कलेक्ट करत नाहीत. यामुळे अ‍ॅप स्टोअरमधील हे सर्वात सुरक्षित अ‍ॅप्स आहेत. युजर्सकडून कोणत्याही भीतीशिवाय हे वापरले जाऊ शकतात.

BIGO, LIVE आणि Likke अ‍ॅपकडून युजर्सचा केवळ 2 टक्के पर्सनल टेडा घेतला जाते. हे सर्व अ‍ॅप्सचा टॉप 20 सर्वाधिक सेफ (सुरक्षित) अ‍ॅपमध्ये सामील आहेत. LinkedIn आणि Uber Eats कडून युजर्सचा 50 टक्के पर्सनल डेटा थर्ड पार्टीला सेंड केला जातो. तर युट्यूब युजर्स 42 टक्के डेटा पाठवते.

या डेटाच्या मदतीने जाहिराती व्हिडिओच्या सुरूवातीस किंवा मध्यभागी दर्शविल्या जातात. डेटा शेअरिंगच्या बाबतीत ई-कॉमर्स कंपनी eBay ही 5 व्या स्थानावर आहे. ही कंपनी युजर्सचा 40 टक्के डेटाचा सेल ट्रॅक आणि सेल करते.

Amazon युजर्सचा डेटा शेअर न करण्याच्या आघाडीवर आहे. Amazon युजर्सचा डेटा कमी ट्रॅक केला जातो. आपल्या जाहिरातींसाठी सुद्धा Amazon जास्त डेटा कलेक्ट करत नाही.

Read in English