उन्हाळ्यात Inverter बनू शकतो बॉम्ब! ‘या’ चुका ठरू शकतात तुमच्या घरासाठी घातक By सिद्धेश जाधव | Published: May 3, 2022 01:21 PM 2022-05-03T13:21:29+5:30 2022-05-03T13:30:07+5:30
वाढत्या भारनियमनामुळे Inverter विकत घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. वीज गेल्यावर घरात लाईट आणि गर्मीतून पंख्यांची हवा देण्याचं काम इन्व्हर्टर करतो. परंतु या उपयुक्त टेक्नॉलॉजीची व्यव्यस्थित काळजी न घेतल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. Inverter Battery Tips And Tricks For Maintenance In Summer
वॉटर रीफिलिंग इन्व्हर्टर बॅटरीची इंटरनल हेल्थ बॅटरी वॉटरवर अवलंबून असते. वॉटर लेव्हल कमी होणार नाही याची काळजी घ्या. पाणी कमी झाल्यास बॅटरी कोरडी पडते आणि त्यामुळे बॅटरी पेट घेऊ शकते.
योग्य वायरिंग खराब किंवा सैल वायरिंग फक्त इन्व्हर्टरसाठी नव्हे तर संपूर्ण घरासाठी घातक आहे. त्यामुळे इन्व्हर्टर घेण्यापूर्वीच योग्यप्रकारे वायरिंग करून घ्यावी.
बॅटरीची काळजी घ्या Inverter च्या Battery मध्ये स्फोट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे इन्व्हर्टर बॅटरी वेळेवेळी चेक करावी. बॅटरी फुगली तर नाही ना? लीक तर नाही ना? किंवा एखाद्या टोकदार वस्तूमुळे बॅटरी फुटली तर नाही ना? याची काळजी घ्या. डॅमेज बॅटरी खूप धोकादायक ठरू शकते.
हवा खेळती ठेवावी जिथे हवा खेळती राहते तिथेच इन्व्हर्टर ठेवण्यात यावा. त्यामुळे उन्हाळ्यात बॅटरी गरम होत नाही. जिथे इन्व्हर्टरवर बॅटरी किंवा बॅटरीवर इन्व्हर्टर ठेऊ नये. दोन्हींमध्ये अंतर देखील ठेवावं.
इलेक्ट्रिशियनची मदत घ्यावी इन्व्हर्टरचं वारंवार सर्व्हिसिंग करण्यासाठी व्यावसायिक इलेक्ट्रिशियनची मदत घ्यावी. सोप्प्या गोष्टींची काळजी आपल्याला घेता येते, परंतु इलेक्ट्रिशियनमुळे तुमच्या इन्व्हर्टरच्या आयुष्यात जास्त भर पडेल. काही बिघाड झाल्यास व्यवसायिक इलेक्ट्रिशियनची मदत घेणं नेहमीच चांगलं असतं.