iPhone Eye Tracking Feature: जबरदस्त! आता iPhone तुमच्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार;नवीन फिचर आले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 03:55 PM2024-09-11T15:55:08+5:302024-09-11T15:58:28+5:30

iPhone Eye Tracking Feature: आता आयफोन वापरकर्त्यांसाठी नवीन फिचर अपडेट आले आहे, या अपडेटमध्ये आता तुमच्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर फोन चालणार आहे.

iPhone Eye Tracking Feature: Apple iPhone वापरकर्त्यांना लवकरच एक फीचर मिळणार आहे, यामुळे तुमचा फोन वापरण्याचा अनुभव बदलेल. आत्तापर्यंत तुम्ही फोन ऑपरेट करण्यासाठी तुमची बोटे वापरता, पण iOS 18 अपडेट रोल आउट झाल्यानंतर तुम्ही फक्त तुमच्या डोळ्यांच्या हावभावाने फोन ऑपरेट करता येणार आहे.

कंपनीने आपल्या नवीन ऑपरेटिंग सिस्टममध्ये आय ट्रॅकिंग फीचरचा समावेश केले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही फक्त डोळ्यांनी फोन कंट्रोल करू शकाल.

Apple चे हे नवीन फिचर सध्या iOS 18 डेव्हलपर बीटामध्ये उपलब्ध आहे, पण कंपनी लवकरच iOS 18 चे व्हर्जन जारी करेल. अहवालानुसार, कंपनी पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये या ऑपरेटिंग सिस्टमचे स्थिर अपडेट यूजर्ससाठी जारी करू शकते.

कंपनीचे म्हणणे आहे की, फीचरसाठी कोणत्याही नवीन हार्डवेअरची आवश्यकता नाही, हे फीचर फोनमध्ये देण्यात आलेल्या फेस आयडी कॅमेरा फिचरवरच काम करेल.

हे फिचर सेट करण्यापूर्वी, तुमच्या फेस आयडीची कॅमेरा लेन्स क्लिन आणि तुम्ही जिथे आहात तिथे पुरेसा प्रकाश हवा. हा कॅमेरा तुमच्या डोळ्यांच्या हालचालींचा मागोवा घेईल.

हे फीचर वापरण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या iPhone किंवा iPad च्या सेटिंगमध्ये जावे लागेल. सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर, Accessibility मध्ये जावे लागेल. यात तुम्हाला फिजीकल अँड मोटर सेक्शन मध्ये जावे लागेल, यात तुम्हाला आय ट्रॅकिंग फिचर मिळेल, तुम्ही येथून हे फिचर चालू करू शकता.

यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर Apple कडून काही सूचना मिळतील, त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत. तुम्हाला स्क्रीनवर काही डॉट दिसतील. तुम्हाला त्या डॉटवर लक्ष केंद्रित करून या स्टेप पूर्ण करावी लागेल. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्ही तुमच्या iPhone मध्ये हे फिचर वापरण्यास सक्षम असाल.