jio 5g recharge plan welcome offer work only over rs 239 plan
जिओ 5G साठी 'हा' रिचार्ज झाला पाहिजे, अन्यथा मिळणार नाही सेवा; जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 06:57 PM2022-10-07T18:57:00+5:302022-10-07T19:11:36+5:30Join usJoin usNext Jio 5G : जिओने सुरुवातीला चार शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. नवी दिल्ली : जिओ (Jio) आणि एअरटेल ( Airtel) या दोन्ही कंपन्यांनी आपल्या 5G सेवेची घोषणा केली आहे. मात्र, 5G सेवा सध्या पॅन इंडिया स्तरावर उपलब्ध नाही. त्यासाठी पुढील वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. जिओने सुरुवातीला चार शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी या शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये ग्राहकांना जिओ 5G चा अनुभव मिळत आहे. कंपनी आपली 5G सेवा वापरण्यासाठी वेलकम ऑफर देखील देत आहे. या अंतर्गत युजर्सना 1GBps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळत आहे. जिओ निवडक युजर्सना 5G सेवेचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रणे पाठवत आहे. तुम्हाला हे आमंत्रण My Jio अॅपवर मिळेल. यासाठी तुम्हाला My Jio अॅपवर जावे लागेल आणि तुम्हाला आमंत्रण आले आहे की नाही, हे नोटिफिकेशनमध्ये तपासावे लागेल. तसे, तुम्हाला My Jio अॅपवर त्याचे आमंत्रण होमपेजवरच दिसेल. कंपनीने या आमंत्रणावर एक अटही ठेवली आहे, ज्याची माहिती वेलकम ऑफरमध्ये देण्यात आलेली नाही. जिओ 5G सेवेचा अनुभव फक्त अशा ग्राहकांनाच मिळेल, ज्यांनी किमान 239 रुपयांचा रिचार्ज केला आहे. म्हणजेच वेलकम ऑफरचा लाभ फक्त अशा ग्राहकांना मिळेल, ज्यांच्या फोनवर 239 रुपये किंवा त्याहून अधिक रिचार्ज असेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही ग्राहकांना जिओ 5G चा लाभ मिळेल, जर त्यांनी रुपये 239 किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज केले असेल. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, जर तुमच्या फोनमध्ये यापेक्षा कमी रिचार्ज असेल तर तुम्ही जिओ 5G वापरू शकणार नाही. या बँड्सवर उपलब्ध असलेली सेवा जिओने दसऱ्याच्या मुहूर्तावर चार शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा मिळेल. मात्र, या चार शहरांमध्ये 5G सेवा अद्याप पूर्णपणे सुरू झालेली नाही. त्याऐवजी टप्प्याटप्प्याने नेटवर्क आणले जात आहे. जिओ युजर्सना n28, n78 आणि n258 बँड्सवर 5G सेवा मिळत आहे.टॅग्स :जिओ५जीमोबाइलJio5GMobile