Jio 5G Network: केवळ या स्मार्टफोनमध्ये मिळेल जियो ५जी, तुमच्या मोबाईलमध्ये चालणार का? असं करा चेक By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 03:03 PM 2022-08-04T15:03:35+5:30 2022-08-04T15:09:05+5:30
Jio 5G Network: दुरसंचार जगतात क्रांतिकारी ठरणाऱ्या ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावात सर्वाधिक बँड्स जियोने खरेदी केले आहेत. जियो टेलिकॉम कंपनीने 700MHz, 800MHz, 1800MHz, 3300MHz आणि 26GHz मध्ये स्पेक्ट्रम मिळवले आहेत. मात्र काही मोजक्याच स्मार्टफोन्समध्ये ५जी नेटवर्क चालणार आहे. त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये जियोचं ५जी नेटवर्क चालणार का हा प्रश्न मोबाईल युझर्सना पडला आहे. दुरसंचार जगतात क्रांतिकारी ठरणाऱ्या ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावात सर्वाधिक बँड्स जियोने खरेदी केले आहेत. जियो टेलिकॉम कंपनीने 700MHz, 800MHz, 1800MHz, 3300MHz आणि 26GHz मध्ये स्पेक्ट्रम मिळवले आहेत. मात्र काही मोजक्याच स्मार्टफोन्समध्ये ५जी नेटवर्क चालणार आहे. त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये जियोचं ५जी नेटवर्क चालणार का हा प्रश्न मोबाईल युझर्सना पडला आहे.
भारतीय बाजारामध्ये गेल्या दोन वर्षांपासून ५जी स्मार्टफोन लॉन्च होत आहे. आधी फ्लॅगशिप सेगमेंट, नंतर मिड रेंज आणि आता लो बजेटमध्येही ५जी स्मार्टफोन्स येऊ लागले आहेत. ५जू नेटवर्कच्या आधी मार्केटमध्ये आलेल्या ५जी नेटवर्कच्या आधी मार्केटमध्ये आलेल्या ५जी स्मार्टफोन अनेक बँड्स सपोर्टसह येऊ शकतात.
बहुतांश स्मार्टफोन्समध्ये ४ किंवा ५ बँड्सचा सपोर्ट मिळतो. तर काहीमध्ये ११ ते १२ बँड्सचा सपोर्ट मिळतो. मात्र टेलिकॉम कंपन्या कुठल्या बँडमध्ये आपली ५जी सर्व्हिस पुरवणार आहेत, हा प्रश्न आहे.
भारतीय टेलिकॉम बाजारामध्ये जियो सर्वात मोठा प्लेअर आहे. तसेच जियोची ग्राहसंख्याही लक्षणीय आणि सर्वाधिक आहे. तसेच या कंपनीने ५जी लिलावामध्ये सर्वाधिक पैसे खर्च केले आहेत.
कंपनीने सर्व २२ सर्कलमध्ये ५जी स्पेक्ट्रम मिळवले आहेत. यामध्ये लो-बँड, मिडबँड आणि mmWave स्पेक्ट्रमचा समावेश आहे. जियोने ज्या ५ बँड्समध्ये स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत, ते 700MHz, 800MHz, 1800MHz, 3300MHz आणि 26GHz आहेत.
स्मार्टफोनमध्ये ज्या ५जी बँड्सना सपोर्ट मिळतो ते N सीरीजपासून सुरू होतात. या बँड्सना त्या रूपात पाहिले तर कंपनीने N28, N5, N3, N77 आणि N258 बँड्समध्ये स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत. यामध्ये 700MHz म्हणजेच N28 बँडमध्ये संपूर्ण भारतात ५जी सेवा मिळेल.
म्हणजेच तुमच्या स्मार्टफोनमध्ये जर वर दिलेले बँड्स असतील, तरच तुम्हाला जियोच्या ५जीची सेवा मिळेल. त्यासाठी आपण हल्लीच लॉन्च झालेल्या कुठल्याही स्मार्टफोनच्या बँड सपोर्टला पाहूया.
iQOO 9T या आठवड्यात भारतात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये N1, N3, N5, nN8, N28, N40, N41, N77, N78 बँड्सचा सपोर्ट मिळतो. म्हणजेच यामध्ये जियो ५जी चालू शकेल.
त्याप्रमाणेच Xiaomi ने हल्लीच भारतात Redmi K50i मोबाईल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये N1, N3, N5, N7, N8, N20, N28A, N38, N40, N41, N77, N78 बँड्सचा सपोर्ट मिळतो. जर तुम्ही जियोच्या बँड्सवर नजर टाकली तर या फोनमध्येही जियो ५जी नेटवर्क चालेल.
तुम्ही तुमच्या ५जी फोमध्ये बँड्स सपोर्टला सहजपणे चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला स्मार्टफोन ब्रँडच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. आता तुम्हाला तुमच्या फोनचं मॉडेल सर्च करावं लागेल आणि त्याच्या विशिष्ट्य पेजवर जावं लागेल. येथे तुम्हाला कनेक्टिव्हिटीचा पर्याय मिळेल. तुम्ही ५जीच्या समोर दिलेल्या बँड्सची लिस्ट चेक करू शकता.