बापरे! जिओ 5G साठी वर्षाला एकासाठी 4,549 रुपये मोजावे लागणार? भन्नाट ट्रिक, १२०० ते १६०० रुपये वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 07:06 PM2024-06-28T19:06:21+5:302024-06-28T19:44:16+5:30

Jio New Recharge Plan hike: जिओचे फाईव्ह जी अनलिमिटेड वापरायचे असल्यास आधी २३९ रुपयांचे रिचार्ज करावे लागत होते. आता त्यासाठी २ जीबी दर दिवसा ही महत्वाची अट आहे, यानुसार अनलिमिटेड इंटरनेटसाठी ३४९ रुपये महिन्याला म्हणजेच २८ दिवसांसाठी मोजावे लागणार आहेत.

रिलायन्स जिओने रिचार्ज प्लॅनमध्ये गुरुवारी सायंकाळी मोठी वाढ करताच आज एअरटेलने देखील प्लॅनमध्ये वाढ घोषित केली आहे. ही दरवाढ येत्या ३ जुलैपासून लागू होणार आहे. वर्षाला रिचार्ज करणाऱ्यांपेक्षा महिन्याला रिचार्ज करणाऱ्यांचा खिसा रिकामा होणार आहे. आम्ही जिओशी संपर्क साधून आमच्या बहुमुल्य वाचकांसाठी एक ट्रिक आणली आहे जी तुमचे तब्बल १6०० रुपये वाचविणार आहे.

जिओचे फाईव्ह जी अनलिमिटेड वापरायचे असल्यास आधी २३९ रुपयांचे रिचार्ज करावे लागत होते. आता त्यासाठी २ जीबी दर दिवसा ही महत्वाची अट आहे, यानुसार अनलिमिटेड इंटरनेटसाठी ३४९ रुपये महिन्याला म्हणजेच २८ दिवसांसाठी मोजावे लागणार आहेत. यानुसार ३६५ दिवसांसाठी तुम्हाला 4,549.46 रुपये मोजावे लागणार आहेत.

वर्षाला एकाचा 4,549 रुपये खर्च, मग जर तुमच्या पत्नीकडे, आई, वडिलांकडे, मुलांकडेही मोबाईल असेल तर काय? मोबाईल वापरायचा खर्च कितीला पडेल? आमच्या कॅल्क्युलेशनुसार जर तुमचे 1200 ते 1600 रुपये वर्षाचे वाचवू शकणार आहात.

जिओने ३३६ दिवसांचा २५४५ रुपयांचा प्लॅन बंद केला आहे. आता ३ जुलैनंतर ३६५ दिवसांचा ३५९९ रुपयांचा प्लॅन उपलब्ध होणार आहे. आधीचा २९९९ रुपयांचाच हा प्लॅन आहे. आता जर तुम्ही ३ जुलैच्या आत आधीच्या किंमतीत हे दोन प्लॅन घेतले तर त्यानुसार तुम्हाला फायदा चालू राहणार की बंद होणार असा प्रश्न निर्माण झाला होता.

जिओनुसार सध्या तुम्ही २३९ किंवा तत्सम वार्षिक प्लॅन घेतला असेल व तो लवकरच संपणार असेल तर तुम्ही ३ जुलैपर्यंत जुना प्लॅन खरेदी करू शकता. त्याचे फायदे त्या प्लॅनची व्हॅलिडिटी संपेपर्यंत चालू राहणार आहेत. म्हणजेच जर तुमचा प्लॅन ३ जुलैनंतर संपत असेल तर तुम्ही आता २५४५ रुपयांचा किंवा २९९९ रुपयांचा प्लॅन घेऊन ठेवू शकता.

हा प्लॅन तुमचा आधीचा प्लॅन संपल्यानंतर अॅक्टीव्हेट होईल व जरी दर दिवसाला १.५ जीबी डेटा असला तरीही तुम्हाला वर्षभर अनलिमिटेड ५जी डेटा मिळत राहिल. एअरटेलनेही हे स्पष्ट केले आहे.

यानुसार जर तुम्ही आताचे प्लॅन घेऊन ठेवले तर तुमचे वर्षाला १२०० रुपये ते १६०० रुपये वाचू शकणार आहेत. पुढील वर्षी हीच वाचलेली रक्कम तुम्ही रिन्यू करण्यासाठी वापरू शकणार आहात.