Jio चा BSNL वर पलटवार; 349 रुपयांचा प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G डेटा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 04:48 PM2024-08-13T16:48:05+5:302024-08-13T16:53:49+5:30

BSNL च्या स्वस्त प्लॅन्सशी स्पर्धा करण्यासाठी आता Jio ने आपला स्वस्त 5G प्लॅन आणला आहे.

मुकेश अंबानी यांच्या मालकीची Jio ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीचे देशभरात 48 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. पण, जेव्हापासून कंपनीने आपले रिचार्ज प्लॅन महाग केले, तेव्हापासून अनेक ग्राहक BSNL मध्ये आपले सिम पोर्ट करत आहेत.

BSNL नेही ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाटी अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत. पण, आता Jio ने BSNL ला मोठा दणका दिला आहे. Jio ने आपल्या करोडो ग्राहकांसाठी एक स्वस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे.

जिओकडे असलेला एक प्लॅन BSNL च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनला टक्कर देत आहे. विशेष म्हणजे, Jio चा हा प्लॅन 5G ग्राहकांसाठी खूप फायदेशीर आहे. कारण, यात ग्राहकाला अनलिमिटेड 5G डेटा मिळतोय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या 5G डेटा प्लॅनसाठी तुम्हाला 350 रुपयांपेक्षा कमी खर्च करावा लागेल.

Jio च्या प्लॅनमध्ये काय मिळेल? Jio आपल्या अनेक प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत 5G डेटा देत आहे. कंपनीचा असाच एक 349 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये जिओच्या 48 कोटींहून अधिक यूजर्सना अनेक फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळते. याशिवाय, कोणत्याही नेटवर्कवर 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात.

डेटा किती मिळतो? या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 56GB डेटा मिळतो. याचा अर्थ तुम्ही दररोज 2GB पर्यंत हाय स्पीड 4G डेटा वापरू शकता. याशिवाय, तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटादेखील मिळतो. फक्त तुमच्या परिसरात 5G कनेक्टिव्हिटी असल्यायला हवी.

जिओ आपल्या ग्राहकांना 349 रुपयांच्या प्लॅनसह अतिरिक्त फायदे देखील देत आहे. यामध्ये तुम्हाला OTT स्ट्रीमिंगसाठी मोफत Jio सिनेमा सबस्क्रिप्शन मिळेल. यासोबतच यामध्ये Jio TV आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील देण्यात आले आहे.