Jio 5G बाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा! जाणून घ्या संपूर्ण देशात 5G सेवा कधी सुरू होणार By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 12:17 PM 2022-12-29T12:17:12+5:30 2022-12-29T12:33:43+5:30
देशात 5G सेवा सुरू होऊन काही दिवस झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या सेवेचे लोकार्पण झाले. पण, सध्या काही शहरातच ही सेवा सुरू झाली आहे. देशात 5G सेवा सुरू होऊन काही दिवस झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या सेवेचे लोकार्पण झाले. पण, सध्या काही शहरातच ही सेवा सुरू झाली आहे. रिलायन्स जिओनेही 5G सेवा काही शहरातच सुरू केली आहे.
नव्या वर्षात जिओ आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी देणार आहे. 5G संदर्भात रिलायसन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे.
कंपनीच्या फॅमिली डे सेलिब्रेशन दरम्यान, मुकेश अंबानी यांनी Jio 5G नेटवर्क जलद उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या टीमचे आभार मानले.
'सर्वोत्तम 5G नेटवर्कची सुरुवात जगातील सर्वात जलद गतीने होत आहे. त्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन, असं मुकेश अंबानी म्हणाले.
'Jio 5G ची सेवा वर्ष 2023 पर्यंत पूर्ण होईल. यासाठी पहिल्या क्रमांकावर राहिल्याबद्दल जिओ टीमचे आभार. जिओ प्लॅटफॉर्मची पुढची पायरी म्हणजे डिजिटल सोल्यूशन्स प्रदान करणे जे इतर बाजारपेठांमध्ये निर्यात केले जाऊ शकतात, असंही मुकेश अंबानी म्हणाले.
याअगोदर कंपनीने जिओ 5G सेवेला 11 शहरात लाँच केले होते. नव्या वर्षात या सेवेला लखनऊ, त्रिवेंद्रम, मैसूर, नाशिक, औरंगाबाद, चंदीगड, मोहाली, पंचकुला, जीरकपूर, खरड आणि डेराबस्सी या शहरात सुरू होणार आहे.
तुम्हाला जिओची 5G सेवा सुरू करण्यासाठी सीम कार्ड अपग्रेड करण्याची गरज नाही. तु्म्ही जुन्या सीम कार्डसह 5G सेवेचा लाभ गेऊ शकता. कंपनीने 5G साठी वेगळे प्लॅनही दिलेले नाहीत. तुम्ही जुन्या प्लॅनमध्येच 5G सेवा वापरु शकता.
तुम्हाला जिओची 5G सेवा सुरू करण्यासाठी सीम कार्ड अपग्रेड करण्याची गरज नाही. तु्म्ही जुन्या सीम कार्डसह 5G सेवेचा लाभ गेऊ शकता. कंपनीने 5G साठी वेगळे प्लॅनही दिलेले नाहीत. तुम्ही जुन्या प्लॅनमध्येच 5G सेवा वापरु शकता.
मात्र, ही सेवा वापरण्यासाठी जिओ वेलकम ऑफर दिली जात आहे. यामुळे यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटा दिला जात आहे. यासाठी वेगळे रिचार्ज करावे लागणार नाहीत. त्याचा वेग 4G पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.