'ही' महत्वाची अ‍ॅप मोबाईलमध्ये ठेवा; कागदपत्रांच्या कटकटीतून मुक्तता मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 12:35 PM2019-03-07T12:35:12+5:302019-03-07T12:40:58+5:30

आपल्याला आधारकार्ड, वाहन परवाना, पॅनकार्डसारखी अनेक कागदपत्रे खिशात बाळगावी लागतात. यामुळे ही महत्वाची कागदपत्रे हरवण्याचीही शक्यता असते. ही कागदपत्रे परत मिळविण्यासाठी जे कष्ट करावे लागतात ते वेगळेच. मात्र, सरकारने ही तुमची डोकेदुखी डिजिटलच्या माध्यमातून सोडविली आहे. ही कार्ड आता अ‍ॅपवरही ठेवता येणार आहेत. म्हणजेच खिशातून ही कार्ड बाळगण्याची गरज राहणार नाही. शिवाय या अ‍ॅपच्या आधारे अन्या कामेही करता येतात.

आधारसाठी UIDAI ने अ‍ॅप लाँच केले आहे. हे अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करावे, आधारशी संलग्न क्रमांकावर ओटीपी आल्यावर पासवर्ड द्वारे आधार कार्ड मोबाईलमध्ये ठेवता येणार आहे. क्यू आर कोड पाठविल्यावर तुमची कामे होणार आहेत.

या अ‍ॅपद्वारे तुम्ही घरबसल्या पासपोर्टसाठी अर्ज करू शकणार आहात. हे अ‍ॅप डाऊनलोड करून काही माहिती भरावी लागणार आहे. या अ‍ॅपमध्ये दिलेल्या पत्त्यावर पोलिस व्हेरिफिकेशन करतील. शिवाय या अ‍ॅपद्वारे पासपोर्ट अधिकाऱ्यासोबत मिळालेली अपॉइंटमेंटही दिसणार आहे. तसेच पासपोर्टसाठी आकारले जाणारे शुल्कही यामध्ये दिसणार आहे.

जर तुम्हाला पॅनकार्ड काढायचे असेल तर कुठेही जायची गरज नाही. my PAN अ‍ॅपद्वारे पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. तसेच पॅन कार्डमध्ये काही चूक असल्यास ती दुरुस्तही करता येणार आहे. शिवाय अन्य अर्जही डाऊनलोड करता येणार आहेत. किंवा उमंग अ‍ॅपद्वारे तुम्ही सर्व कागदपत्रे डिजिटली एकाच अ‍ॅपवर साठवून ठेवू शकता.

m - Parivahan या अ‍ॅपद्वारे तुम्हा वाहन चालक परवाना, वाहनाची कागदपत्रे ठेवू शकता. शिवाय एखाद्या नंबरवरून त्या कार मालकाची माहितीही मिळविता येणार आहे.