Lava announces MyZ smartphone series comes with ability to upgrade specifications
मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया, 'या' भारतीय कंपनीनं लाँच केले स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन By जयदीप दाभोळकर | Published: January 7, 2021 03:03 PM2021-01-07T15:03:10+5:302021-01-07T15:11:25+5:30Join usJoin usNext स्वदेशी कंपनी लावा मोबाईल्सनं भारताता Z सीरिजचे चार मेक इन इंडिया स्मार्टफोन्स लाँच केले आहे. तसंच या स्मार्टफोन्सची किंमत सामान्यांना परवडणारी असून यात अनेक फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त कंपनीनं Lava Befit SmartBand देखील लाँच केला आहे. याव्यतिरिक्त विशेष बाब म्हणजे लावा Z सीरिजनं myZ मोबाईल्स कस्टमाईझ्ट करण्याचा ऑप्शनही दिला आहे. यानुसार ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार मोबाईचे फीचर्स आणि डिझाईन ठेवता येणार आहे. याव्यतिरिक्त हे सर्व फोन मेड इन इंडिया असल्याचा दावाही कंपनीनं केला आहे. तसंच यामध्ये ग्राहकांच्या आवडीच्या फीचर्सवरही लक्ष देण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. Lava Mobiles ने भारतात लाँच केलेल्या Lava Z1 मध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज दिलं आहे. या मोबाईलची किंमत ५,४९९ रूपये इतकी आहे. तर दुसरीकडे कंपनीनं लाँच केलेल्या Lava Z2 मध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. कंपनीनं या मोबाईलची किंमत ६,९९९ रूपये ठेवली आहे. तर Lava Z4 या मोबाईलमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबीचं स्टोरेज देण्यात आलं असून त्याची किंमत ८,९९९ रूपये असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. याव्यतिरिक्त कंपनीनं आणखी एक Lava Z6 हा मोबाईल लाँच केला आहे. यामध्ये ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आलं असून त्याची किंमत ९,९९९ रूपये इतकी आहे. कंपनीनं Z सीरिजच्या मोबाईल्ससह Lava Befit SmartBand देखील लाँच केला आहे. याची किंमत २,६९९ रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. कंपनीनं ग्राहकांच्या आवडीकडे लक्ष देत myZ स्मार्टफोन्सचीही सुविधा दिली आहे. यामध्ये ग्राहकांना आपल्या आवडीचं डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्ससहित मोबाईल कस्टमाईझ करता येणार आहे. यामध्ये ६० पेक्षा अधिक डिझाईन ऑप्शन देण्यात आले आहेत. या सर्व स्मार्टफोन्सची विक्री ११ जानेवारीपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्सद्वारे केली जाणार आहे. तसंच Lava Z1 आणि Z Up या स्मार्टफोन्सची विक्री २६ जानेवारीपासून केली जाणार आहे. टॅग्स :तंत्रज्ञानमोबाइललावामेक इन इंडियाtechnologyMobilelavaMake In India