फोटो: वयाच्या ८० व्या वर्षी चक्क ८० पोर्श कारचा मालक असलेला अवलिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 06:08 PM2020-12-23T18:08:26+5:302020-12-23T18:14:56+5:30

वय तर फक्त एक आकडा आहे. इच्छा पुरेशी आहे, असं आपण ऐकलं असेल पण व्हिएन्ना येथील एका ८० वर्षीय वृद्धानं ते सिद्ध करुन दाखवलंय. ओटोकार हे वयाच्या ८० व्या वर्षी ८० आलिशान कारचे मालक झाले आहेत.

वय तर फक्त एक आकडा आहे. इच्छा पुरेशी आहे, असं आपण ऐकलं असेल पण व्हिएन्ना येथील एका ८० वर्षीय वृद्धानं ते सिद्ध करुन दाखवलंय. ओटोकार हे वयाच्या ८० व्या वर्षी ८० आलिशान कारचे मालक झाले आहेत. (सर्व छायाचित्र: getty images)

ओटोकार यांचं जस वय वाढतंय तसं त्यांच्या जवळील चारचाकी गाड्यांचीही संख्या वाढत जातेय. पोर्श कारचं कलेक्शन करणाऱ्या ओटोकार यांनी आपल्या ताफ्यात ८० वी कार दाखल करुन घेण्यासाठी सर्वात महागडी बॉक्सस्टर स्पाइडर कार विकत घेतलीय. हातात सिगार आणि मोकळ्या रस्त्यावर आलिशान कारमधून फिरणं ओटोकार पसंत करतात.

पोर्श कारबद्दलचं त्यांचं प्रेम हे तब्बल ५० वर्ष जूनं आहे. लहान असताना त्यांनी एक पोर्श कार त्यांच्या घरामागच्या रस्त्यावरुन जाताना पाहिली होती. कारचा वेग पाहून त्यांना पोर्शबद्दलचं अप्रूप निर्माण झालं होतं. त्यांनी पुढे लगेचंच पैसे साठवणं सुरु केलं आणि स्पीड यलो ९११ ही पहिली पोर्श कार त्यांनी विकत घेतली होती.

ओटोकार यांनी पुढे एक ९१७, दुर्मिळ अशी ८ सिलिंडर इंजिन असलेली ९१०, ९०४ आणि ९५६ या कार देखील खरेदी केल्या. आतापर्यंत त्यांनी ८० कार खरेदी केल्या असून सध्या ते ३८ कारचे मालक आहेत.

पोर्श कार खरेदी करणंच नव्हे, तर त्या चालवण्यातही एक वेगळी मजा आहे, असं ओटोकार आवर्जुन सांगतात. विशेष म्हणजे इतक्या कार ठेवण्यासाठी त्यांच्याकडे गॅरेज नव्हतं. गाड्यांच्या पार्किंगसाठी त्यांना एक अख्खी इमारत बांधावी लागली. ओटोकार यांनी आपल्या कारसाठी वेगळी इमारत बांधली असून या इमारतीला ते स्वत:ची 'लिविंग रुम' समजतात.

एका संपूर्ण इमारतीत पोर्श कार एका ठिकाणी पार्क केल्यानंतर जणू ते खेळण्यांचं दुकान वाटतं. इमारतीत त्यांच्या कार दोन सरळ रांगेत एकमेकांसमोर ठेवण्यात आलं आहे. यात रेसिंग कार्सचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे, पोर्श कार निर्मिती कंपनी देखील ओटोकार यांचा सन्मान करते. "कार या फक्त कार आहेत. ती एक मशीन आहे. पण ओटोकार यांच्यासारख्या व्यक्तींमुळे मशिनींनी तयार झालेल्या कारला श्वास मिळतो", असं कंपनी म्हणते.