Christmas Sale: Redmi स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इयरबड्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; आताच बघा बेस्ट डील्स
By सिद्धेश जाधव | Updated: December 18, 2021 19:04 IST2021-12-18T18:49:03+5:302021-12-18T19:04:16+5:30
सर्वच कंपन्यांनी आपल्या ख्रिसमस सेलची घोषणा केली आहे. मग यातून Xiaomi कशी मागे राहील. कंपनीनं Mi Christmas Sale ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये Redmi डिव्हाइसेसवर चांगला डिस्काउंट मिळत आहे.

Redmi च्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इयरबड्ससह अनेक प्रोडक्ट्सवर सूट दिली जात आहे. हा सेल मर्यादित कालावधीसाठी असेल. त्याआधीच सेलमधील डील्सवर एक नजर टाकूया.
Redmi Note 11T 5G
हा रेडमीचा स्वस्त 5G Phone आहे, जो मीडियाटेक डाइमेंसिटी 810 प्रोसेसरसह लाँच झाला आहे. Redmi Note 11T 5G मध्ये 5000mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग, 50MP रियर कॅमेरा मिळतो. प्रायमरी आणि 8MP अल्ट्रा-वाईड लेन्स का ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. हा डिवाइस 21 डिसेंबरला 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, ज्याची किंमत 22,899 रुपये आहे.
Redmi 9i
मीडियाटेक हीलियो G25 चिपसेट, 5000mAh ची बॅटरी असलेला हा Redmi 9i स्मार्टफोन ख्रिसमस सेलमध्ये 8499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Redmi 9A
21 डिसेंबर पर्यंत रेडमी 9A स्मार्टफोन देखील फक्त 6,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.
RedmiBook 15 Series
सेलमध्ये RedmiBook ई-लर्निंग एडिशन 34,499 रुपये आणि RedmiBook 15 Pro लॅपटॉप 43,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही ऑफर फक्त 22 डिसेंबर पर्यंत वैध आहे.
Redmi Earbuds 3 Pro
Redmi Earbuds 3 Pro मध्ये 5.2 टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हे बाँड्स डिस्काउंटसह 2,499 रुपयांमध्ये विकत घेता येतील. ही ऑफर 21 डिसेंबरपर्यंत वैध आहे.