Surface Duo 2 फोल्डेबल स्मार्टफोनसह Microsoft चे अनेक जबरदस्त प्रोडक्ट सादर; पाहा फोटोज आणि स्पेसिफिकेशन्स By सिद्धेश जाधव | Published: September 23, 2021 06:29 PM 2021-09-23T18:29:01+5:30 2021-09-23T18:38:32+5:30
Microsoft ने फोल्डेबल स्मार्टफोन Surface Duo चा अपग्रेडेड मॉडेल Surface Duo 2 सह Surface Laptop Studio, Surface Pro 8, Surface Go 3 आणि Surface Pro X देखील सादर केले आहेत. Microsoft ने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोन Surface Duo चा अपग्रेड व्हर्जन Surface Duo 2 लाँच केला आहे. त्याचबरोबर कंपनीने Surface Laptop Studio ची देखील घोषणा केली आहे. इतकेच नव्हे तर या इव्हेंटमधून Surface Pro 8, Surface Go 3 आणि Surface Pro X देखील लाँच करण्यात आले आहेत. हे सर्व प्रोडक्ट्स मध्ये अपग्रेड्ससह Windows 11 ला सपोर्ट करतील.
Microsoft Duo 2: Microsoft Surface Duo 2 मध्ये दोन 5.8 इंचाचे डिस्प्ले देण्यात आले आहेत जे 2754×1896 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz हाई रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात. दोन्ही डिस्प्ले एकत्र जोडल्यावर 8.3 इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा फ्लॅगशिप फोल्डेबल स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 SoC सह येतो आणि Android 11 आधारित Microsoft कस्टमाइज्ड UI वर चालतो. फोनच्या मागे 12MP चे तीन कॅमेरे असलेला सेटअप आणि 12MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो आहे. 8GB पर्यंतचा रॅम 512GB पर्यांतची स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 1,499 (जवळपास 1,10,660 रुपये) पासून सुरु होईल.
Surface Laptop Studio: कंपनीचा नवीन Surface Laptop Studio लॅपटॉप नवीन Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. यात ultra-durable Dynamic Woven Hinge देण्यात आला आहे. लॅपटॉप मोडमध्ये यात फुल की-बोर्ड आणि हॅप्टिक टच-पॅड मिळतो. यात 14.4 इंचाचा पिक्सल सेंस टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टॅबलेट कम लॅपटॉप Surface Slim Pen 2 ला सपोर्ट करतो. स्टूडियो मोडमध्ये यातील ऑप्टिमल कॅनवासच्या मदतीने स्केचिंगसह समवेत अनेक क्रिएटिक गोष्टी करता येतील. यात 11th gen intel Core H35 प्रोसेसर आणि NVIDIA GeForce RTX ग्राफिक्स प्रोसेसिंग यूनिट देण्यात आला आहे. किंमत: 1,599 डॉलर (जवळपास 1,18,041 रुपये)
Surface Pro 8: Microsoft च्या 2-in-1 डिवाइस Surface Pro 8 मध्ये 11th gen Intel Core प्रोसेसर, दोन थंडरबोल्ट 4 पोर्ट आणि बिल्ट-इन Intel Evo प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. 16 तासांच्या बॅटरी बॅकअपसह येणारा हा लॅपटॉप Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. यात 120Hz रिफ्रेश रेट, Dolby Vision आणि अडॅप्टिव कलर टेक्नॉलॉजी असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर 5MP चा फ्रंट कॅमेरा आणि 10MP चा रियर कॅमेरा मिळतो. हा लॅपटॉप कमटॅबलेट Surface Slim Pen 2 ला सपोर्ट करतो. किंमत: 1,099.99 (जवळपास 81,206 रुपये)
Surface Pro X: कंपनीच्या या नवीन लॅपटॉपमध्ये LTE कनेक्टिविटी मिळते. Microsoft SQ2 ARM सिलिकॉनसह हा लॅपटॉप कम टॅबलेट Windows 11 वर चालेल. यात ऑल डे बॅटरी लाइफ देण्यात आला आहे. याच्या नवीन Wi-Fi मॉडेलची किंमत 899.99 डॉलर (जवळपास 66,441 रुपये) आहे.
Surface Go 3: Microsoft ने Surface Go 3 हा अफोर्डेबल 2-in-1 टॅबलेट सादर केला आहे. यात 10.5 इंचाची स्क्रीन मिळते. कंपनीने यात Intel Core i3 प्रोसेसरचा वापर केला आहे. हा देखील लेटेस्ट Windows 11 प्लॅटफॉर्मवर चालेल. हा LTE अॅडव्हान्स कनेक्टिविटी फीचरसह येतो. यात ऑल डे बॅटरी आणि बिल्ट-इन मायक्रोसॉफ्ट सिक्योरिटी फीचर देण्यात आले आहे. साउंडसाठी यात Dolby Audio फीचर मिळतो. याच्या Wi-Fi मॉडेलची किंमत 399.99 डॉलर (जवळपास 29,529 रुपये) आहे.
Surface Slim Pen 2: Microsoft ने नवीन Surface Slim Pen 2 देखील सादर केला आहे. या डिजिटल पेनमध्ये झिरो प्रेशर फोर्स, अल्ट्रा लो लेटन्सी सारखे फीचर देण्यात आले आहेत, त्यामुळे हा सहज नियंत्रित करता येतो. या स्मार्ट पेनची टिप रीडिजाइन करण्यात आली आहे. याची किंमत 129.99 डॉलर (जवळपास 9,596 रुपये) आहे.