Mobile Number Portability : मोबाईल नंबर पोर्ट करायचाय?; घरबसल्या काही मिनिटांत होईल काम, पाहा प्रक्रिया By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 02:24 PM 2021-11-24T14:24:22+5:30 2021-11-24T14:31:56+5:30
How To Port Mobile Number : आपला नंबर कायम ठेवून आवडीचा सर्व्हिस प्रोव्हाडर निवडण्याची सेवा ग्राहकांना देण्यात येत आहे. मोबाईल नंबर पोर्टेबलिटीद्वारे तुम्ही एका सर्व्हिस प्रोव्हायडरमधून दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हाडरमध्ये जाऊ शकता. आपला नंबर कायम ठेवून आवडीचा सर्व्हिस प्रोव्हाडर निवडण्याची सेवा ग्राहकांना देण्यात येत आहे. मोबाईल नंबर पोर्टेबलिटीद्वारे तुम्ही एका सर्व्हिस प्रोव्हायडरमधून दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हाडरमध्ये जाऊ शकता.
काही वर्षांपासून देशात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा येण्यापूर्वी ग्राहकांना त्यांचा मोबाईल क्रमांक बंद करावा लागत होता किंवा दुसरं सिमकार्ड घेणं भाग होतं. परंतु आता MNP या सेवेद्वारे आपला तोच मोबाइल क्रमांक कायम ठेवून दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हाडरची सेवा घेणं शक्य झालं आहे.
आपण राहत असलेल्या परिसरात मिळणारं नेटवर्क किंवा अन्य बाबी पडताळून कोणता मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडर निवडायचा याची सर्वस्वी निवड संबंधित ग्राहकाची असते. एमएनपी या सेवेचा वापर करून सहजरित्या एका सर्व्हिस प्रोव्हाडरमधून दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सेवा घेणं शक्य आहे.
यापूर्वी एमएनपीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी देशातील काही राज्ये वगळून केवळ सात कामकाजाच्या दिवसांचा कालावधी लागत होता. परंतु आता ही प्रक्रिया अजून जलद करण्यात आली असून २ ते ३ कामकाजांच्या दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येते.
तुम्हाला जर नंबर पोर्ट करायचा असेल तर तुम्हाला घरबसल्या काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक UPC कोड जनरेट करावा लागेल. युपीसी कोड हा एक युनिक पोर्टिंग कोड असतो.
युपीसी कोड जनरेट करण्यासाठी तुम्हाला एक मेसेज करावा लागे. मेसेज बॉक्समध्ये जाऊन ORT (Space) Mobile Number, नंतर हा मेसेज 1900 या क्रमांकावर पाठवावा. मेसेज पाठवल्यानंतर काही मिनिटांमध्ये तुम्हाला एक युपीसी कोड मिळेल.
यानंतर तुम्हाला ज्या कोणत्या मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडरची सेवा हवी असेल त्यांच्या अधिकृत स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही नंबर पोर्ट करण्याची रिक्वेस्ट टाकू शकता. याशिवाय आता अनेक सर्व्हिस प्रोव्हाडर ऑनलाइन पद्धतीनंदेखील पोर्टची रिक्वेस्ट घेतात. तसंच यासाठी आवश्यक असलेली केव्हायसी प्रोसिजर घरी येऊन पूर्ण केली जाते.
तुमची केव्हायसी प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर संबंधित सर्व्हिस प्रोव्हायडरकडून एक सिमकार्ड देण्यात येतं. हे सिमकार्ड पोर्ट होण्यासाठी काही राज्ये वगळून जास्तीत जास्त ३ कामकाजाचे दिवस लागतात.