Mobile Phone Exchange Offer: नवीन स्मार्टफोन घेताना एक्स्चेंजमध्ये जुना देता? एक ट्रिक जी तुम्हाला जास्तीचे पैसे मिळवून देईल By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 03:16 PM 2023-04-08T15:16:49+5:30 2023-04-08T15:35:25+5:30
Smartphone Exchange Trick: स्मार्टफोन एक्स्चेंजचे गौडबंगाल काय? एक ट्रिक जी तुम्हाला जास्तीचे पैसे मिळवून देईल... पण त्यासाठी तयारी करावी लागेल... आजच्या काळात बरीचशी कामे ऑनलाईन केली जात आहेत. हे हातातल्या एका छोट्या यंत्राने करून दाखविले आहे. आता तर हे मोबाईलही घेण्याची आणि विकण्याची पद्धत ऑनलाईनच झाली आहे. यामुळे मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानांनादेखील ऑनलाईन ऑफर पाहून किंमत ठेवावी लागत आहे.
असे असले तरी एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतलीय का... फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या जुन्या मोबाईलची एक्स्चेंज ऑफर दिली जाते. ती नेमकी काय असते? तुम्हाला फायदा की त्यांना? ते या फोनचे करतात तरी काय? चला या प्रश्नांची उत्तरे शोधुया...
आज दररोज नवनवे फोन लाँच होत आहेत. लोक जुने मोबाईल बदलून नवे फोन घेत आहेत. अशावेळी ऑनलाईन कंपन्या तुम्हाला चांगली किंमत देऊन जुना फोन घेत आहेत, नवा देत आहेत. एक्स्चेंज ऑफर दिली की तुम्हाला तेवढी किंमत कमी केली जाते आणि उरलेल्या रकमेत नवा फोन दिला जातो.
या ई कॉमर्स साईटना ही स्कीम या मोबाईल कंपन्याच देत असतात. म्हणून तुम्ही पाहिले असेल मोबाईल कंपनी किंवा मॉडेनुसार तुम्हाला तुमच्या जुन्या मोबाईलची कमी जास्त किंमत दिसते. ही किंमत तुम्ही घेत असलेल्या नव्या फोननुसार बदलते.
जुना मोबाईलमध्ये त्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतो. बॅटरी कमी वेळ चालते, आवाज, रेंज किंवा कॅमेरा अशा एक ना एक गोष्टीवर तुम्ही नाराज असता. यामुळेच तर तुम्ही नवीन फोन घेता. मग तुम्हाला जुन्या फोनला चांगली किंमत हवी असते. म्हणून तुम्ही विकत असता. तोच एक्सचेंजला गेला तर तुम्हाला कमी पैसे द्यावे लागतात.
याचा फायदा असा की तुम्ही ईएमआयवर घेत असाल तर कमी ईएमआय बसतो. दुसरा म्हणजे कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉयच्या फॉल्ट लक्षात नाही आला तर तुम्हाला जॅकपॉटच लागला. तिसरा म्हणजे कमी किंमतीत तुम्हाला नवीन अपडेटेड फोन मिळतो.
फोन घेणाऱ्याला काय फायदा तुमचा जुना फोन एक्स्चेंज ऑफरमध्ये जो घेतो, तो व्हेंडरकडे जातो. तो त्यातील समस्या दूर करून जास्त दराने तो विकतो. याचबरोबर व्हेंडरला फोन एक्स्चेंज करून नव्या फोनचा सेल वाढविल्याच्या बदल्यात कमिशन मिळते. सेल खूपच वाढला तर मग बघायलाच नको, कंपन्या खूश होऊन बक्षिसांची लयलूट करतात.
कंपन्यांना फायदा काय? एक्स्चेंज ऑफरमध्ये कंपन्यांना फायदा काय होतो... कंपन्या त्यांच्या नव्या मोबाईलकडे ग्राहकांना खेचतात. त्यामुळे त्यांची विक्री वाढते. त्यासाठी त्यांना जाहिरात करावी लागत नाही. लोकांना एक्स्चेंज ऑफर दिसली की ते तिकडे वळतात. जुन्या मोबाईलसाठी खर्च जरी केला तरी कंपन्यांना दीर्घ कालावधीसाठी फायदा होतो.
हे करून पहा... फायदा होईल जर तुम्हाला तुमच्या मोबाईलचे पैसे कमी येत असल्याचे वाटत असतील तर तुम्ही बाहेर हा फोन विकण्याचा प्रयत्न करा. एक्स्चेंजमध्ये जरी मोबाईल घेत असाल तरी जर तुमचा मोबाईल बाहेरच्या दुकानदाराकडे किंवा ओएलएक्स सारख्या साईटवर विकला गेला तर नवीन मोबाईलच्या डिलिव्हरीवेळी एक्स्चेंज नाकारून तुम्ही डिलिव्हरी बॉयला एक्स्चेंजमध्ये कमी झालेले पैसे देऊ शकता.