अगं बाई अरेच्चा! टॅटू सांगणार 'ब्रेन की बात'; तंत्रज्ञानाचा भन्नाट आविष्कार By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 04:37 PM 2020-05-17T16:37:10+5:30 2020-05-17T17:00:25+5:30
शरीरावर फक्त टॅटू लावून डोक्यात काय चालतंय असं जर कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वास बसणार नाही पण हो हे खरं आहे. तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालं आहे. आजकाल तरूणाईमध्ये टॅटूची फारच क्रेझ बघायला मिळते. तरूण मंडळी शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डिझाइनचे टॅटू काढतात. सध्या तो ट्रेंडच झाला आहे.
शरीरावर फक्त टॅटू लावून डोक्यात काय चालतंय असं जर कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वास बसणार नाही पण हो हे खरं आहे. तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालं आहे.
मेंदूचं कार्य कसं सुरू आहे हे समजण्यासाठी डोक्यावर इलेक्ट्रोड लावले जातात. मात्र आता हेच इलेक्ट्रोड्स टॅटूच्या रूपात विकसित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
शास्त्रज्ञांनी टॅटू इलेक्ट्रोड (Tattoo Electrode) विकसित केला असून टॅटू शरीरावर लावून मेंदूत काय चाललं आहे हे समजण्यास मदत होणार आहे.
फ्रान्सेस्को ग्रेसो यांनी इटलीतील शास्त्रज्ञांसह टॅटू इलेक्ट्रोड तयार केला आहे. या टॅटूमध्ये 700 ते 800 नॅनोमीटर्स आहेत जे त्वचेत समान प्रमाणात पसरतात.
EEG इलेक्ट्रोडच्या या टॅटूची चाचणी यशस्वी झाली आहे. आतापर्यंत MEG साठी फक्त वेट इलेक्ट्रोडचा उपयोग होत होता.
टॅटू इलेक्ट्रोडमुळे वेळ आणि पैसा या दोघांची बचत करता येऊ शकत असल्याची माहिती मिळत आहे. (फोटो -APA / TU Graz / Greco)
फ्रान्सच्या लॉरा फेरारी यांनी मेंदूतील लहरींची वारंवारता खूप कमी असते. शिवाय EEG तून मिळणारे संकेतही कमी असतात, त्यांना पकडणं EMG आणि ECG संकेतांपेक्षाही कठीण असतं असं म्हटलं आहे.
टॅटू इलेक्ट्रोडमध्ये कंडक्टिव पॉलिमरचा वापर करतात. म्हणजे यामध्ये कोणते धातू नाहीत त्यामुळे MEG चाचणी करताना कोणतीच समस्या येत नाही.
टॅटू लावलेल्या ठिकाणावर केस असले तरीदेखील सिग्नल रेकॉर्ड करण्याच्या प्रक्रियेत काहीच अडचण येत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.