most useful top secret codes of android smartphone you should know
'हे' Secret Codes सांगणार तुमच्या स्मार्टफोनचे डीटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 05:46 PM2018-12-21T17:46:24+5:302018-12-21T17:56:29+5:30Join usJoin usNext स्मार्टफोन हा प्रत्येकाच्याच जगण्याचा एक महत्त्वाचा भाग झाल्याने मोठ्याप्रमाणावर त्याचा वापर केला जातो. मात्र असे काही Secret Codes आहेत ज्यामुळे स्मार्टफोनचे डीटेल्स मिळतात. या Secret Codes बाबत जाणून घेऊया. *#*#4636#*#* हा कोड टाकल्यानंतर स्मार्टफोनसंदर्भातील माहिती मिळते. फोनची बॅटरी, मोबाईलचे डीटेल्स, वाय-फाय, अॅप युजेससह अनेक गोष्टींची माहिती मिळते. *#*#2664#*#* हा कोड टाकल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन नीट काम करते की नाही याबाबत माहिती मिळते. *2767*3855# हा कोड टाकल्यानंतर स्मार्टफोन रिसेट होतो. मात्र गरज असल्याशिवाय हा कोड डायल करू नका कारण हा कोड टाकल्यावर स्मार्टफोनचा डेटा उडू शकतो. *#*#34971539#*#* हा कोड टाकल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबाबत पूर्ण माहिती मिळेल. *#*#0842#*#* हा कोड वापरून स्मार्टफोनचं व्हायब्रेशन टेस्ट करता येतं. स्मार्टफोनचा वापर करताना प्रायव्हसी ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळेच *#21# अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या कोडच्या मदतीने तुम्ही तुमचा व्हॉईस कॉल, मेसेज आणि अन्य डेटा अन्य ठिकाणी फॉरवर्ड केला जात तर नाही ना याबाबत माहिती मिळते. टॅग्स :मोबाइलतंत्रज्ञानMobiletechnology