Motorola launches Moto G7 and Motorola One; View pricing and features
मोटरोलाचे दोन नवे फोन लाँच; पहा किंमत आणि फिचर्स By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 05:43 PM2019-03-25T17:43:14+5:302019-03-25T17:47:21+5:30Join usJoin usNext चीनी कंपनी लिनोवोच्या मालकीची कंपनी मोटोरोलाने आज दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. Moto G7 आणि Motorola One असे या फोनची नावे आहेत. या दोन्ही फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि ड्युअल रिअर कॅमेरासारखे फिचर देण्यात आले आहेत. Moto G7 स्मार्टफोन 6.24 इंचाचा फुल एचडी प्लस मॅक्स व्हिजन एलटीपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. रिझोल्यूशन 1080x2270 पिक्सल आहे. फोनमध्ये 1.8 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर सोबत 4 जीबी रॅम दिली आहे. इंटरनल स्टोरेज 64 जीबी आहे. स्टोरेज कार्डद्वारे ही मेमरी 512 जीबी पर्यंत वाढविता येते. 3000 एमएएचची बॅटरी 15 वॅटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 12 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा 5 मेगापिक्सलच्या कॅमेरासह देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच युएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे. तर मोटरोला वन मध्ये 5.9 इंचाचा फुल एचडी प्लस मॅक्स व्हिजन एलटीपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. रिझोल्यूशन 720x1520 पिक्सल आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर सोबत अॅड्रीनो 506 जीपीयू देण्यात आला आहे. 4 जीबीची रॅम 64 जीबी सोबत असून 256 जीबीपर्यंत वाढविण्यात येऊ शकते. कॅमेरा 13 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. टॅग्स :मोबाइललेनोव्होMobileLenovo