netflix is finally letting people play games on android
Netflix चं नवीन फीचर, युजर्संना आता अॅपमध्ये मिळणार गेम By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 02:31 PM2021-08-29T14:31:43+5:302021-08-29T15:17:17+5:30Join usJoin usNext Netflix : आता Netflixने Stranger Things गेम्सपासून सुरुवात केली आहे. Netflixवर व्हिडिओ गेम खेळण्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. आता Netflix त्यावर काम करत आहे. लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix अधिकृतपणे अँड्रॉइड अॅपसाठी गेमिंगची टेस्ट करत आहे. याचा अर्थ असा आहे की, युजर्स या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पाहण्याव्यतिरिक्त गेम खेळू शकतील. पहला गेम जो Netflix पर उपलब्ध होगा वो Netflix के पॉपुलर ओरिजिनल सीरीज Stranger Things से इंस्पायर होगा. पहिला गेम जो Netflixवर उपलब्ध होईल, तो Netflix च्या पॉपुलर ओरिजिनल सिरीज Stranger Things पासून प्रेरणादायी ठरेल. Stranger Things 1984 आणि Stranger Things 3 वर युजर्स Netflix अॅपमध्ये खेळू शकतात. याबद्दल कंपनीकडून एक ट्विटही करण्यात आले होते. परंतु सध्या तरी हे मर्यादित ठेवले जाईल. म्हणजेच Netflix शो आणि गेमिंगला सध्या तुम्ही मर्ज करू शकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे Netflix सध्या पोलंडमध्ये या गेमिंग फीचरची टेस्ट करत आहे. फक्त काही लोकच त्याचा वापर करू शकतील. ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix नेही हे फीचर अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचे वृत्त दिले आहे. इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या यावर अजून काम करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, Netflix ने गेल्या महिन्यात गेमिंगची पुष्टी केली. कंपनीने सांगितले होते की, ओरिजिनल मूव्ही, शो आणि अनस्क्रीप्टेड शोजसारखीच ही कोअर कॅटॅगरी असेल. हे प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शन प्लॅनचा भाग असेल, जेणेकरून युजर्संना अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. आता Netflixने Stranger Things गेम्सपासून याची सुरुवात केली आहे. Netflix येत्या काळात टायटल्ससह गेम देखील लाँच करू शकते, असे म्हटले जात आहे. तसेच, थर्ड पार्टी गेम्स सुद्धा उपलब्ध करु शकते. जेणेकरून युजर्सजवळ अनेक पर्याय उपलब्ध असतील.Read in English